शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावमध्ये आणखी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 23:41 IST

नाशिक : मालेगावमध्ये कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. शुक्रवारी (दि.२४) मृतांच्या संख्येत आणखी दोघांची भर पडल्याने मालेगावातील मृतांचा आकडा तब्बल ११ वर पोहोचला आहे. दरम्यान, येवल्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शिवाय नाशिक शहरातही शुक्रवारी आणखी एक बाधित आढळून आल्यामुळे प्रशासन चांगलेच धास्तावले आहे.

नाशिक : मालेगावमध्ये कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. शुक्रवारी (दि.२४) मृतांच्या संख्येत आणखी दोघांची भर पडल्याने मालेगावातील मृतांचा आकडा तब्बल ११ वर पोहोचला आहे. दरम्यान, येवल्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शिवाय नाशिक शहरातही शुक्रवारी आणखी एक बाधित आढळून आल्यामुळे प्रशासन चांगलेच धास्तावले आहे.  जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. मुंबई-पुणे पाठोपाठ मालेगावदेखील हॉटस्पॉट ठरले असून, बाधितांची संख्या शंभरापुढे गेली आहे. शुक्रवारच्या अहवालानुसार मालेगावमध्ये आणखी कोरोनाबाधित आढळल्याने एकट्या मालेगावातील बाधितांची संख्या ११८ वर गेलेली आहे.नाशकातही शुक्रवारी बाधित आढळून आला. हा बाधित मूळचा शहरातील नसून मानखुर्द येथून भंडारा येथे जात असताना त्यास पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले असल्याचे सांगण्यात येते.-----------जिल्ह्यात १३४ बाधितजिल्ह्यात कोेरोनाचे संकट कायम आहे. शुक्रवारी उशिरापर्यंतच्या माहितीनुसार बाधितांची संख्या १३४ वर गेली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्याच्या ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येतील त्या भागातील सुरू असलेल्या अत्यावश्यक सेवादेखील तत्काळ बंद करण्याचा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे.-----------जिल्ह्यातील येवला येथेही कोरोनाने शिरकाव केला. शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार येवल्यात एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील मालेगाव, सिन्नर नंतर येवला तालुकाही कोरोनाच्या कक्षेत आल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.---------अतिरिक्त कुमकमालेगावी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आरोग्य विभागातील आणखी १४२ कर्मचाऱ्यांची कुमक रवाना करण्यात आली आहे. यापूर्वीही ४० आरोग्य अधिकारी देण्यात आले आहेत. त्यात भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांचा समावेश आहे. त्यांना तातडीने मालेगावी रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक