शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

दोघे अल्पवयीन : लॉकडाऊनचा फायदा घेत भांडी पळविणारे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 14:33 IST

नाशिक :  लॉकडाऊनचा फायदा घेत मार्च ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान पेठरोडवरील एका हॉटेलचा पत्रा उचकटून हॉटेलमध्ये ठेवलेले प्रिंटर, संगणक, धातूची ...

ठळक मुद्देचौघा संशयितांना ताब्यात घेतलेदोघे अल्पवयीन असल्याचे तपासात पुढे आले

नाशिक :  लॉकडाऊनचा फायदा घेत मार्च ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान पेठरोडवरील एका हॉटेलचा पत्रा उचकटून हॉटेलमध्ये ठेवलेले प्रिंटर, संगणक, धातूची भांडी, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे असा ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरी करणाऱ्या नेणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले विरगाव येथून चौघा संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याडूकन चोरी केलेले धातूची भांडी हस्तगत करण्यात आली आहेत. त्यापैकी दोघे अल्पवयीन असल्याचे तपासात पुढे आले आहेत.या चोरी प्रकरणी हॉटेल महाराष्ट्र दरबारचे व्यवस्थापक अशरफ नजीर मणियार यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पेठरोडवर असलेल्या हॉटेलात संशयित राहुल संजय तुरे हा वेटर म्हणून कामाला होता. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने शासनाने गेल्या मार्च महिन्यात लॉकडाऊन केले होते. त्यामुळे हॉटेल ऑगस्ट महिन्यापर्यंत बंद होते. दरम्यान याच कालावधीत संशयित तुरे याने त्याचा साथीदार शिवा राजू उफाडे तसेच अन्य दोघा अल्पवयीन बालकांच्या मदतीने हॉटेलचा पत्रा उचकावून प्रवेश करत धातूची पातेले संगणक, प्रिंटर, सीसीटीव्ही कॅमेरे असा ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक भगत यांनी स्थानिक गुन्हे शोधपथकाला या गुन्हाच्या छडा लावण्याचे आदेश दिले होते.संशयिताच्या आईचा मोबाईल क्रमांक मिळाला त्या नुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण करत संशयिताला नगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने विधीसंघर्षित बालकांच्या मदतीने हॉटेलमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकातील बाळनाथ ठाकरे, विजय मिसाळ, सागर कुलकर्णी, आनंद चौधरी, किरण सानप, राकेश शिंदे, विलास चारोस्कर आदींनी सापळा रचून त्याच्या दुसऱ्या साथीदारालाही हुडकून काढले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने दोन्ही अल्पवयीन मुलांची माहिती दिली. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटकtheftचोरी