शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:54 IST

शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाहनचोरीसह घरफोडीच्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये भीती व्यक्त होत आहे.

नाशिक : शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाहनचोरीसह घरफोडीच्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये भीती व्यक्त होत आहे. चोरट्यांच्या टोळीकडून बंद घरांना लक्ष्य केले जात असल्याने नागरिकांना परगावी जाणे धोक्याचे वाटू लागले आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी तीन घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख २ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून, अद्याप शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दुचाकी, चारचाकी चोरीपासून घरफोडीपर्यंतच्या सर्वच गुन्ह्यांसह हाणामारीच्या घटनाही नित्यनेमाने घडत असल्याने संताप व्यक्त होत आहे. नवनियुक्त आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी नाशिककरांना गुन्हेगारीचा बीमोड करण्याचा विश्वास दिला आहे. त्यांनी जमावबंदी आदेश लागू करून विविध पोलीस ठाणे हद्दीत कारवाईच्या सूचनाही केल्या आहेत. मात्र शहरातील पंचवटी, अंबड, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, सरकारवाडा, देवळाली कॅम्प, नाशिकरोड, भद्रकाली, गंगापूर, आडगाव अशा सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी, दुकानफोडी, वाहनचोरी, सोनसाखळी चोरी, मोबाइल चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांच्या नाकीनव आले आहे.पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी पाच दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला, तसेच तारवालानगर येथे एका बंद घराचे कुलूप तोडून सुमारे ८३ हजारांचा ऐवज लंपास केला. दुसऱ्या घटनेत पाइपलाइनरोडवरील गणेशनगरमध्ये चोरट्यांनी व्यंकटेश मोडक यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून कपाटातील ३२ हजारांची रोकड हातोहात लांबविली. तिसऱ्या घटनेत अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी हेमांगी पाटील (२७, रा. पाटीलनगर) यांच्या बंद घराच्या पाठीमागील दरवाजाला खड्डा करून लावलेली कडी उघडून घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे सुमारे ८७ हजारांचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची फिर्याद त्यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. यामध्ये तीस ग्रॅमची सोन्याची पोत, ११ हजाराचे मंगळसूत्र, दहा ग्रॅमची कर्णफुले, वेल असे अकरा हजारांचे दागिने, पंधरा हजारांच्या चांदीच्या साखळ्या, तीन घड्याळे चोरट्यांनी लंपास केली आहेत.नागरिक हवालदिल; चोरट्यांची टोळी सक्रियशहरातील विविध उपनगरांमध्ये चोरट्यांच्या वाढत्या उपद्रवाने नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोख पोलीस गस्तीची मागणी जोर धरू लागली आहे. गुन्हे शोध पथकानेही डोळ्यांत तेल घालून संशयित चोरट्यांचा माग काढण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. घरफोडी करणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय घेतला जात आहे.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिस