शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

धारगावला दाम्पत्यास बांधून दोन लाखांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 01:47 IST

घरातील मागील बाजूस असलेले शटर वाकवून चौघा दरोडेखोरांनी दाम्पत्यास बांधून घरातील रोख रकमेसह दागिने असा दोन लाख २ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना धारगाव घोटी (ता. इगतपुरी) येथे रविवारी पहाटे उघड झाली. घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : घरातील मागील बाजूस असलेले शटर वाकवून चौघा दरोडेखोरांनी दाम्पत्यास बांधून घरातील रोख रकमेसह दागिने असा दोन लाख २ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना धारगाव घोटी (ता. इगतपुरी) येथे रविवारी पहाटे उघड झाली. घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धारगाव घोटी येथील ज्ञानेश्वर (गणेश) कचरू नवाटे यांचे घरालगतच हॉटेल आहे. ते पत्नी व तीन मुलींसमवेत राहतात. मध्यरात्री ३ ते ३.३० च्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील चौघा दरोडेखोरांनी हॉटेलच्या मागील बाजूस असलेले शटर टॉमीने वाकवून आत प्रवेश केला. ज्ञानेश्वर नवाटे यांना कोणीतरी आल्याची चाहूल लागताच चौघांनी त्यांना पकडत प्रतिकार करण्याच्या आत दोराने बांधले.  त्यांच्या मदतीला आलेल्या पत्नी सरला यांनाही या चौघांनी बांधून ठेवले व नवाटे यांच्या तीन मुली पायल, माऊली, पिंकी या समोर असताना या टाळक्याने दमदाटी करीत कपाटातील सोन्याचे मंगळसुत्र, चैन, अंगठी, झुबे असे सुमारे ८० हजाराचे दागीने व रोख एक लाख वीस हजार असा एकूण दोन लाख दोन हजाराचा ऐवज घेवून पलायन केले.या घटनेनंतर गावात खळबळ उडाली, घोटी पोलिसांना या बाबत माहिती देण्यात आल्यानंतर पोलिस उप निरीक्षक विलास घिसाडी व त्याच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. या प्रकरणी ज्ञानेश्वर नवाटे यांच्या तक्रारीनंतर घोटी पोलिस ठाण्यात १४५/१८ भा.द. वि. कलम ३९४, ४५७, ३४२, ४५२ (३४) अ मुंबई पोलिस अ‍ॅक्ट १३५ अन्वये गुन्हा नोंद केली असून पोलिस उप निरीक्षक घिसाडी हे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिस