शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

झापाला लागलेल्या आगीत दोन लाखांची रोकड खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 02:35 IST

सटाणा : झापाला लागलेल्या भीषण आगीत आदिवासी शेतकरी कुटुंबाचे संसारोपयोगी वस्तू, धान्य तसेच दोन लाख रुपयांची रोकड जळून खाक झाली. ही घटना बागलाण तालुक्यातील मोहोळागी येथे बुधवारी (दि.४) दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.

ठळक मुद्देसटाणा : बागलाण तालुक्यातील मोहोळागी येथील घटना

सटाणा : झापाला लागलेल्या भीषण आगीत आदिवासी शेतकरी कुटुंबाचे संसारोपयोगी वस्तू, धान्य तसेच दोन लाख रुपयांची रोकड जळून खाक झाली. ही घटना बागलाण तालुक्यातील मोहोळागी येथे बुधवारी (दि.४) दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.गजमल तुळशीराम सूर्यवंशी हे आपल्या कुटुंबीयांसमवेत शेतात काम करत असताना अचानक घराला आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीत संसारोपयोगी वस्तू, धान्य तसेच रोकड जळून खाक झाली. आगीत सुमारे पावणेतीन लाखांचे नुकसान झाले. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. दरम्यान, तलाठी नागरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.बँकेने नोटा नाकारल्या....घराचे बांधकाम करण्यासाठी सूर्यवंशी यांनी दोन लाख रुपये घरात ठेवले होते. मात्र या दुर्घटनेत दोन लाख रुपयांची रोकड अर्धवट जळाली. याबाबत महसूल यंत्रणेने तसा पंचनामादेखील केला आहे. या नोटा बदलण्यासाठी पीडित शेतकरी भारतीय स्टेट बँकेच्या सटाणा शाखेत गेले असता संबंधित अधिकाऱ्याने शेतकऱ्याला चक्क बाहेरचा रस्ता दाखवला. अधिकाऱ्यांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे संताप व्यक्त केला जात असून, जळालेल्या नोटा तात्काळ बदलून द्याव्यात, अशी मागणी केली जात आहे.

(०४ मोहोळी १, २)

टॅग्स :fireआगAccidentअपघात