शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
6
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
7
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
8
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
9
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
10
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
11
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
12
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
13
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
14
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
15
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
16
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
17
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
18
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
19
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

दोघा जिगरबाजांची कोकण कड्यावर सायकलने स्वारी!

By admin | Updated: November 24, 2014 00:27 IST

अशीही जिद्द : तीन तासांचा थरार; अनेकांनी परावृत्त करूनही पाच हजार फूट उंचावर दुर्गप्रेमी युवक पोहोचले सायकलने

नाशिक : कोकण कडा... भंडारदऱ्याजवळच्या हरिश्चंद्र गडाच्या माथ्यावरील समुद्रसपाटीपासून तब्बल पाच हजार फूट उंच कडा... घनदाट जंगल, नदी, नाले, दुर्गम कपाऱ्या पार करून तेथे पोहोचावे लागते. अनेक दुर्गप्रेमी या कड्याला भेट देत असतात; मात्र मुंबईच्या दोघे दुर्ग व सायकलप्रेमी युवकांनी चक्क सायकलने कोकण कडा गाठून जणू विक्रमाचीच नोंद केली. कोकण कड्यावर सायकलने स्वारी करण्याचे हे पहिलेवहिले धाडस ठरले आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर सचिन वाडेकर आणि उत्पादन शुल्क अधिकारी सिद्धेश काकाणी अशी या दोघांची नावे. हे दोघे मुंबई-गोवा, मुंबई-पुणे, माळशेज घाटावर नेहमी सायकलिंग करतात. आरोग्य उत्तम राखण्यासाठी सायकलिंग आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हे दोघे हरिश्चंद्र गडावरील कोकण कड्यावर सायकलने पोहोचण्याच्या जिद्दीने तेथे गेले. पायथ्याजवळच्या गावात गाडी पार्क करून, सायकलचे वेगवेगळे पार्ट जोडून त्यांनी सायकली तयार केल्या. हेल्मेट, पाणी, खाद्यपदार्थ बरोबर घेऊन ते कोकण कड्याची मोहीम फत्ते करायला निघाले. रस्त्यात अनेक पर्यटकांनी त्यांना सायकल वर न नेण्याचा सल्ला दिला. काहींनी तर त्यांना वेड्यातही काढले; पण त्यांचा निर्णय पक्का होता. कधी सायकली खांद्यावर टाकत, तर कधी चालवत, तर कधी अवघड कपारीतून वाट काढत तीन तासांच्या प्रवासानंतर ते कोकण कड्यावर पोहोचले. या परिसरात नाशिकच्या दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गड-किल्ले स्वच्छता अभियानात भाग घेऊन गड-किल्ले वाचविण्यासाठी आम्हीदेखील प्रयत्न करू, असे आश्वासनदेखील त्यांनी दिले. वीकेण्डला घरात आराम करण्यापेक्षा व्यस्त कामातून वेळ काढून सायकलिंग वा ट्रेकिंग केल्यास कोणताही आजार जडणार नाही, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.