इगतपुरी : शहरातील जोगेश्वरी परिसरातील सकाळी घरात नेहमीप्रमाणे बाथरूममध्ये अंघोळ करायला बाथरूममधील गॅस गिझर लावला असता तो लीक असल्याने गॅसचा अचानक मोठा भडका उडाला होता, या घटनेत मुनफ शेख भाजले गेले. त्यांचा आरडाओरडा ऐकून त्यांचा मुलगा वाचविण्यास गेला असता तो देखील या भडक्यात भाजला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या गॅस गिझर लीकेजमुळे प्रसंगावधान राखत दरवाजा बंद केला. मात्र, गॅसचा भडका अधिक असल्यामुळे बाथरूमच्या काचा फुटून आगीच्या ज्वाळा बाहेर पडल्या व दरवाजाही तुटला. यावेळी मुनफ यांच्या मुलाने अश्याही परिस्थितीत गॅस गिझर बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.यातील जखमी मुलावर इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मुनाफ शेख हे जास्त भाजल्याने त्यांच्यावर नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
गॅसगिझर लीक होऊन पेट घेतल्याने दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 22:59 IST
इगतपुरी : शहरातील जोगेश्वरी परिसरातील सकाळी घरात नेहमीप्रमाणे बाथरूममध्ये अंघोळ करायला बाथरूममधील गॅस गिझर लावला असता तो लीक असल्याने गॅसचा अचानक मोठा भडका उडाला होता, या घटनेत मुनफ शेख भाजले गेले.
गॅसगिझर लीक होऊन पेट घेतल्याने दोन जखमी
ठळक मुद्देमुलगा वाचविण्यास गेला असता तो देखील या भडक्यात भाजला