शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दोनशे भाविकांचा पश्चिम बंगालमधून परतण्याचा मार्ग अद्यापही ‘बंद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 16:41 IST

नाशिक : जुने नाशिक, हरसूल, नाशिकरोड या भागातून सुमारे २०९ आबालवृद्ध भाविक पश्चिम बंगाल राज्यातील मालडा जिल्ह्यातील धार्मिक तीर्थक्षेत्र ...

ठळक मुद्दे १८ खोल्यांमध्ये ‘डिस्टन्स’ ठेवत राहण्याची व्यवस्था भाविक पंडवामध्ये सुरिक्षत आहेराहत फाउण्डेशनच्या वतीने जिल्हाधिकारी मांढरे यांना निवेदन

नाशिक : जुने नाशिक, हरसूल, नाशिकरोड या भागातून सुमारे २०९ आबालवृद्ध भाविक पश्चिम बंगाल राज्यातील मालडा जिल्ह्यातील धार्मिक तीर्थक्षेत्र पंडवाशरीफमधील जेष्ठ सुफी संत हजरत मखदूम आलम शेख अलाहुल हक पंडवी यांच्या वार्षिक उरु सासाठी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल झाले. त्यांनतर २२मार्चपासून कोरोना आजाराच्या पाशर््वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन घोषित करण्यात आल्याने या भाविकांचे महाराष्ट्रात येण्याचे सगळे मार्ग बंद झाले ते आजतागायत. मागील सव्वा मिहन्यांपासून आपल्या लहानग्यांना घेऊन ९८ महिला आणि ८५ पुरु ष हे पंडवाच्या कुतुब शहारातील एका खासदारांच्या निवासस्थानी वास्तव्यास आहेत. महाराष्टÑात परतणारे पुरेसे प्रवासी नसल्यामुळे रेल्वे प्रशासनाने अद्यापही या भाविकांना ‘हिरवा झेंडा’ दाखविलेला नाही.पश्चिम बंगालमधील मालडा जिल्ह्यातील कुतुबशहर हे प्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. पंडवा या मुख्य शहरात हे तीर्थक्षेत्र आहे. सालाबादप्रमाणे मार्चमध्ये येथील सुफी संतांचा वार्षिक उरूस साजरा केला गेला. या उरुसासाठी मध्यनाशिक परिसरातून सुमारे २०९ भाविक रेल्वेने आपल्या कुटुंबियांसह पोहोचले. दरम्यान कोरोना आजाराने देशभरात थैमान घातल्यामुळे भारत सरकारकडून संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यामुळे या भाविकांचे महाराष्ट्रात परतण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहे ते आजतागायत. परिणामी या भाविकांच्या नाशिकिस्थत नातेवाईकांमध्ये चांगलीच चिंता वाढली आहे; मात्र सर्व भाविक हे आपल्या नातेवाईकांसोबत सातत्याने मोबाईलद्वारे संपर्कात असून एकमेकांना धीर देत आहेत. परंतु गेल्या दीड महिन्यापासून आपले कुटुंबीय नातेवाईक आपल्यापासून शेकडो किलोमीटर अंतरावर परराज्यात अडकून पडल्यामुळे येथील नातेवाईकमध्ये सहाजिकच तणावाचे वातावरण कायम आहे.

सुदैवाने कुतुब शहर व पंडवाच्या महिला खासदार मौसम नूरबी व माजी खासदार शहनाजबी कादरी यांनी या सर्व अतिथी भाविकांची जबाबदारी स्वयंस्फूर्तीने स्वीकारल्यामुळे भाविकांचा मानसिक तणाव कमी झाला. या भाविकांची नूरबी यांच्या निवासस्थानासह तेथील १८ खोल्यांमध्ये ‘डिस्टन्स’ ठेवत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्याचप्रमाणे कुतुब शहर चे सरपंच तसेच तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि माजी खासदार मौसम नूर बी यांच्यामार्फत मागील दीड ते दोन महिन्यांपासून सर्व भाविकांना चहा-नाश्तासह दोन वेळचे जेवण पुरविले जात असल्याचे येथे अडकून पडलेले छायाचित्रकार मोबीन पठाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दरम्यान पालकमंत्री छगन भुजबळ स्थानिक आमदार देवयानी फरांदे यांनी स्थानिक जिल्हा प्रशासनाकडे या २०९ भाविकांची संपूर्ण यादी सोपविले आहे तसेच त्याबाबत आता केंद्र सरकारकडून परराज्यात अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी जाण्याचा मार्ग मोकळा करून देण्याबाबत आदेश प्राप्त झाल्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या प्रशासनासोबत योग्य तो समन्वयात लवकरात लवकर साधून या भाविकांना तत्काळ नाशिक मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत त्यांच्या नाशिकिस्थत नातेवाईकांनी देखील व्यक्त केले आहे हे सर्व भाविक सुदैवाने सुदृढ असून त्यांना आरोग्याच्या कुठल्याही तक्र ारी नसल्याचे पठाण यांनी स्पष्ट केले आहे त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी देखील करण्यात आली आहे मालदा जिल्ह्यामध्ये कोरोना चा फारसा प्रभाव नसल्याने हे सर्व भाविक पंडवामध्ये सुरिक्षत आहे. त्यामुळे येथील नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.दरम्यान, शहरातील राहत फाउण्डेशनच्या वतीनेसुध्दा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना पुन्हा निवेदन देण्यात आले असून लवकरात लवकर पंडवामध्ये अडकून पडलेल्या भाविकांना परतीचा मार्ग खूला करुन द्यावा, अशी मागणे फाउण्डेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसwest bengalपश्चिम बंगालrailwayरेल्वेnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयChagan Bhujbalछगन भुजबळ