शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रणालयात दोन तास कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 01:08 IST

चलार्थपत्र मुद्रणालयात निलंबित करण्यात आलेल्या दोघा कामगारांचे निलंबन रद्द करावे या मागणीसाठी दोन्ही मुद्रणालयात मंगळवारी सकाळी दोन तास कामबंद आंदोलन करण्यात आले. चार दिवसांपूर्वी अधिकारी व कामगार नेत्यांमध्ये झालेल्या वादविवादाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून मुद्रणालय महामंडळ अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय समिती मंगळवारी मुद्रणालयात चौकशीसाठी दाखल झाली आहे.

नाशिकरोड : चलार्थपत्र मुद्रणालयात निलंबित करण्यात आलेल्या दोघा कामगारांचे निलंबन रद्द करावे या मागणीसाठी दोन्ही मुद्रणालयात मंगळवारी सकाळी दोन तास कामबंद आंदोलन करण्यात आले. चार दिवसांपूर्वी अधिकारी व कामगार नेत्यांमध्ये झालेल्या वादविवादाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून मुद्रणालय महामंडळ अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय समिती मंगळवारी मुद्रणालयात चौकशीसाठी दाखल झाली आहे.  चलार्थपत्र मुद्रणालयातील कॅन्टीनजवळील गटारीच्या सदोष कामावरून गेल्या शुक्रवारी अधिकारी व कामगार नेत्यांमध्ये वादविवाद होऊन प्रकरण हातघाईपर्यंत गेले होते. या घटनेची माहिती दिल्लीत मुद्रणालय महामंडळ वरिष्ठ अधिकाºयांपर्यंत गेली. त्यानंतर सोमवारी मुद्रणालयाचे महाप्रबंधक के.एन. महापात्रा यांनी मुद्रणालय मजदूर संघ, कार्यकारिणी सदस्य संपत घुगे व जी.वाय. काळे यांना निलंबित केल्याची कारवाई केली.  दोघा कामगारांवर केलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी, कामामध्ये भ्रष्टाचार होऊ नये या मागणीसाठी मंगळवारी सकाळी चलार्थपत्र व भारत प्रतिभूती मुद्रणालयात सर्व कामगारांनी दोन तास कामबंद आंदोलन पुकारले होते. निलंबन रद्द करण्यात यावे या मागणीसाठी मुद्रणालय व्यवस्थापन व मजदूर संघाच्या पदाधिकाºयांमध्ये चर्चा सुरू होती. दोन तासानंतर कामगारांनी काम सुरू केले.  चलार्थपत्र मुद्रणालयात चार दिवसांपूर्वी झालेला वादविवाद, निलंबनाची कारवाई व सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी दिल्ली मुद्रणालय महामंडळाचे अतिरिक्त व्यवस्थापक विजय गुप्ता, एचआर व्यवस्थापक दुर्गा प्रसाद, ए.के. श्रीवास्तव या तीन वरिष्ठ अधिकाºयांची समिती मुद्रणालयात दुपारी दाखल झाली. घडलेल्या घटनेची सर्व माहिती त्रिसदस्यीय समितीने घेतली. मजदूर संघाचे पदाधिकारी या संदर्भात सायंकाळी त्या समितीच्या अधिकाºयांची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी गेल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात मजदूर संघ पदाधिकाºयांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Nashikनाशिक