शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:36 IST

भिवंडीहून दोघा अल्पवयीन मुलींचे अपहरण करून पळवून नेणाऱ्या दोघा संशयितांना नाशिकरोड रेल्वेस्थानकावर पोलिसांनी पकडून मुलींना त्यांच्या पालकांच्या हवाली केले आहे.

नाशिकरोड : भिवंडीहून दोघा अल्पवयीन मुलींचे अपहरण करून पळवून नेणाऱ्या दोघा संशयितांना नाशिकरोड रेल्वेस्थानकावर पोलिसांनी पकडून मुलींना त्यांच्या पालकांच्या हवाली केले आहे.भिवंडी येथील दोन अल्पवयीन मुली मंगळवारी (दि.१६) कुठेतरी निघून गेल्याचे त्यांच्या पालकांच्या लक्षात आले. दोन्ही मुलींचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर झुनिआ बिंद व त्याचा अल्पवयीन मित्र यांच्याविरुद्ध भिवंडी पोलीस ठाण्यात दोघा अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अपहरणाचा व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. भिवंडी पोलीस याप्रकरणी संशयितांचा शोध घेत असताना दोघा अल्पवयीन मुलींना घेऊन रेल्वेने बिहारला जाणार असल्याची माहिती मिळाली. संशयितांजवळील असलेल्या मोबाइलचे लोकेशन नाशिकरोड रेल्वेस्थानकाजवळ मिळत होते. त्यानुसार भिवंडी पोलिसांनी तत्काळ नाशिकरोड रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून दोन अल्पवयीन मुली व दोघा संशयितांची माहिती, फोटो मोबाइलवर पाठविले. नाशिकरोड रेल्वेस्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सहायक उपनिरीक्षक रवींद्र पाटील, जावेद शेख व इतर कर्मचारी रेल्वेस्थानक व बाहेरील परिसरात शोध घेत असताना दोन्ही अल्पवयीन मुली दोघा संशयित मुलांसोबत नाशिकरोड रेल्वेस्थानकावर बिहारला जाणाºया रेल्वेची वाट पाहत असताना आढळून आले. रेल्वे पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुली व दोघा मुलांना ताब्यात घेऊन भिवंडी पोलिसांना माहिती दिली. भिवंडी पोलिसांनी लागलीच नाशिकरोड गाठून दोघा संशयितांना ताब्यात घेत अल्पवयीन मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी