शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

मोबाइलची चोरी करणाऱ्या दोन टोळ्या  जेरबंद ; लाखोंचे मोबाइल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:12 IST

शहर तसेच ग्रामीण भागातून मोबाइलवर बोलत जाणारे नागरिक, बसस्थानक, रेल्वेस्थानक, भाजीबाजार या सार्वजनिक ठिकाणाहून नागरिकांच्या खिशातून मोबाइलची चोरी करणाऱ्या दोन टोळ्यांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने शनिवारी (दि.२८) जेरबंद केले. या टोळ्यांमधील पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे तब्बल १०९ मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत.

पंचवटी : शहर तसेच ग्रामीण भागातून मोबाइलवर बोलत जाणारे नागरिक, बसस्थानक, रेल्वेस्थानक, भाजीबाजार या सार्वजनिक ठिकाणाहून नागरिकांच्या खिशातून मोबाइलची चोरी करणाऱ्या दोन टोळ्यांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने शनिवारी (दि.२८) जेरबंद केले. या टोळ्यांमधील पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे तब्बल १०९ मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत.  शहर व परिसर तसेच ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी दिवसा व रात्रीच्या वेळी दुचाकीवरून जाणारे वा पायी जाणाºया नागरिकांना रस्त्यात गाठून शस्त्राचा धाक दाखवून मोबाइल लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. शहरातील अनेक ठिकाणच्या आठवडे व दैनंदिन भाजीबाजारातही मोबाइल चोरीचे प्रमाण वाढले होते. या मोबाइल चोरट्यांचा तपास करत असतानाच काही दिवसांपूर्वी पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना मोबाइल चोरणाºया टोळीतील संशयितांची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कॅनडा कॉर्नर परिसरातील सुनील ऊर्फ गटºया नागू गायकवाड, वाडगाव येथील संपत लक्ष्मण वाघ व दिंडोरीरोड अवधूतवाडी येथील विकी ऊर्फ गट्ट्या संजय जाधव यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने शहर व जिल्ह्यातील मोबाइल चोरीची कबुली दिली.  पोलिसांनी अटक केलेल्या टोळीतील दोन संशयित पसार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, रघुनाथ शेगर, हवालदार मोतीराम चव्हाण, विलास बस्ते, सुरेश नरवडे, संतोष काकड, दशरथ निंबाळकर, संदीप शेळके, महेश साळुंखे, सतीश वसावे, भूषण रायते, विलास चारोस्कर, सचिन म्हसदे, जितेश जाधव, बाळनाथ ठाकरे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली़कुख्यात गुन्हेगारमोबाइल चोरी प्रकरणात पंचवटी पोलिसांनी सुनील ऊर्फ गटºया नागू जाधव या संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहे. जाधव हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, तर गंगापूर, सिडको, अंबड, सातपूर परिसरांत त्याची मोठी दहशत आहे़सर्वांत मोठी कारवाई  पंचवटी पोलिसांनी यापूर्वी तब्बल १०५ मोबाइल जप्त करण्याची कारवाई केली होती. शनिवारी पंचवटी पोलिसांनी केलेल्या कारवाईत साडेपाच लाख रुपयांचे तब्बल १०९ मोबाइल जप्त केले असून, पोलीस आयुक्तालयातील ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगितले जाते़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा