शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहरातील दोन अभियंत्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:52 IST

ऐन होळी सणाच्या दिवशी शहरातील म्हसरूळ व सिडको परिसरात दोन अभियंत्यांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.२०) उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

नाशिक : ऐन होळी सणाच्या दिवशी शहरातील म्हसरूळ व सिडको परिसरात दोन अभियंत्यांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.२०) उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या तरुण अभियंत्याने गळफास घेतला, तर म्हसरूळ येथे सीडीओ मेरी कार्यालयातील अभियंत्याने आजारपणाला कंटाळून गळफास घेत जीवनयात्रा संपविली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सीडीओ मेरी कार्यालयात अभियंता म्हणून नोकरीस असलेले शिवाजी केरु प्पा चौघुले (५७) यांनी म्हसरूळ येथे राहत्या घरी आजारपणाला कंटाळून गळफास घेतला. चौघुले यांनी आत्महत्येपूर्वी आजाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा मजकूर लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळून आली आहे. निसर्गनगर म्हसरूळ येथील रहिवासी चौघुले हे मेरी येथे अभियंता म्हणून नोकरीला होते.इमारतीवरून कोसळून इसम ठारइंदिरानगर परिसरातील विश्वा हाईट्स या अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावर राहणारे कांतीभाई कालुभाई जिगाणे (४०) हे राहत्या घराच्या सातव्या मजल्यावरून अचानकपणे गुरुवारच्या सकाळी कोसळले. यामुळे जिगाणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हा प्रकार त्यांचे बंधू कपील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलविले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉ. राहुल मोदगी यांनी घोषित केले.

टॅग्स :Deathमृत्यूNashikनाशिक