शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

दोन दबंग कुत्र्यांनी बिबट्याला फरफटत नेत पिटाळले; वनविभाग झाला अलर्ट; पिंजरा बसविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 12:25 IST

या घटनेला वनविभागानेही दुजोरा दिला आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, निफाड (नाशिक): आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात कुत्र्यांचा बळी गेल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत. मात्र, निफाड तालुक्यातील दिंडोरी तास येथील शेतकऱ्याच्या दोन गावठी कुत्र्यांनी शिकारीला आलेल्या बिबट्यावरच हल्ला चढविल्यानंतर बिबट्याने त्यातून कशीबशी सुटका करून घेत पळ काढल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. या घटनेला वनविभागानेही दुजोरा दिला आहे.

निफाड तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठे असल्याने बिबट्याचा अधिवास आढळतो. बिबट्याने आजवर मानवांसह पशुधन, कुत्रे यांच्यावर हल्ले करीत त्यांचा फडशा पाडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. परंतु, गुरुवारी रात्री कुत्र्यांनीच बिबट्यावर हल्ला चढवत त्याला पिटाळून लावल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २१) रात्री १२:३० वाजेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात बिबट्या दिंडोरी तास फाट्याजवळ तलावालगत असलेल्या कैलास दिनकर गांगुर्डे व योगेश फकिरा गांगुर्डे यांच्या वस्तीवर आला.

कुत्र्यांवरचा हल्ला बिबट्याच्या अंगलट

तेथे दोन कुत्रे बसलेले पाहताच बिबट्या कुत्र्यांच्या दिशेने चालून गेला. मात्र, हे कुत्रेच आपला जीव वाचविण्यासाठी बिबट्यावर तुटून पडले. यात गांगुर्डे यांच्या टॉमी नावाच्या गावठी कुत्र्याने या बिबट्याचा जबडा आपल्या तोंडात पकडून ठेवल्याने बिबट्याला हालचाल करणे अवघड झाले.टॉमी कुत्र्याने जबड्याच्या बाजूने, तर दुसऱ्या कुत्र्याने बिबट्याच्या दुसऱ्या मागच्या बाजूने तोंडाने धरून अक्षरशः या बिबट्याला फरफटत नेले.  

वनविभाग झाला अलर्ट; पिंजरा बसविणार

या घटनेबाबत वनविभागाला माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी गांगुर्डे यांच्या वस्तीवर पोहोचले व घटनेची माहिती जाणून घेतली. घटनेच्या ठिकाणी पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.   टॉमी नावाचा कुत्रा आहे. २ ते ३ कुत्र्यांशी एकाचवेळी सामना करू शकतो, असे श्वानमालक योगेश गांगुर्डे यांनी सांगितले.

टॅग्स :leopardबिबट्याdogकुत्रा