लोकमत न्यूज नेटवर्कनिफाड : तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरु ठार झाल्याची घटना घडली. म्हाळसाकोरे ते कोमलवाडी रस्त्यालगत भरत गणपत मुरकुटे आणि सोमनाथ सखाहरी पडोळ हे शेतात वस्ती करून राहतात . मुरकुटे आणि पडोळ यांच्या वस्त्यांमध्ये १५९ ते २०० फुटांचे अंतर आहे. दोघांच्याही घराजवळ असलेल्या शेडमध्ये गायी व वासरे बांधलेले होते. गुरुवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने प्रथम मुरकुटे यांच्या शेडमधील वासरांवर हल्ला करून त्यास ठार करून उसाच्या शेतात नेले. नंतर पडोळ यांच्या शेडमधील वासराचा फडशा पाडला.
बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरू ठार
By admin | Updated: July 8, 2017 00:23 IST