शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

दोघा भावांचा तळ्यात पडल्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 23:09 IST

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील लोणवाडी परिसरात खेळत असताना शेततळ्यात पडल्याने दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार (दि. १६) रोजी घडली. १३ दिवसांनंतरही पोलीस ठाण्यात या घटनेबाबत कोणतीही नोंद केली नसल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यातील लोणवाडीतील घटना : अद्याप पोलिसांकडे नोंद नाही

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील लोणवाडी परिसरात खेळत असताना शेततळ्यात पडल्याने दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार (दि. १६) रोजी घडली. १३ दिवसांनंतरही पोलीस ठाण्यात या घटनेबाबत कोणतीही नोंद केली नसल्याचे सांगण्यात आले.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील लोणवाडी परिसरात राहणाऱ्या माणिक लक्ष्मण गायकवाड यांची दोन मुले कुणाल ( ४) व गौरव (७) ही शेततळ्याच्याच परिसरात खेळत असताना, अचानक कुणाल पाण्यात पडला. त्यावेळी परिसरात कोणीही नव्हते. भाऊ तळ्यात पडल्याचे लक्षात येताच गौरवने आरडाओरडा केला, मात्र कोणीच मदतीला नसल्याने, गौरव स्वतः आपल्या भावाला वाचविण्यासाठी तळ्यात उतरला. मात्र छोट्या भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघेही पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले.दरम्यान माणिक लक्ष्मण गायकवाड यांना आपली दोन्ही मुले जवळपास न दिसल्याने त्यांनी गौरव आणि कुणाल यांचा शोध घेतला. पण त्यांना दोघे कुठेही दिसले नाहीत. त्यांनी तळ्यात बघितले असता दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले.कुणाल आणि गौरव हे दोघेही सोडून गेल्याने संपूर्ण गाव शोकमग्न बनला होता. शोकाकुल वातावरणात या दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, चुलते आणि आजी असा परिवार आहे.दरम्यान, ही घटना बुधवारी (दि.१६) घडली. मात्र पोलीस ठाण्यात त्याची अद्याप १३ दिवसांनंतरही नोंद करण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. घटना घडून आज १३ दिवस झाले, मात्र या घटनेची नोंद अद्यापही केलेली नाही.घटनेला १३ दिवस...लोणवाडीतील या दोन चिमुकल्यांचा शेततळ्यातील पाण्यात बुडून अंत झाल्याची घटना बुधवारी (दि. १६) घडली. मात्र याची पोलीस दरबारी कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. घटनेच्या दोन आठवड्यांनंतरही अद्याप पोलिसात नोंद नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.देशसेवेत पाठविण्याचे स्वप्न अधुरेवडील माणिक गायकवाड यांचे बंधू संदीप गायकवाड हे पोलीस सेवेत मुंबईमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत कुणाल आणि गौरव पोलीस आणि देशसेवेत जाणार असल्याचे स्वप्न लहान असतानाच बघत होते. मात्र काळाने त्यांना हिरावून नेले.अल्पभूधारक शेतकरीअवघी दोन बिघा जमीन. त्यात दोघे भाऊ. एक मुंबईमध्ये पोलीस, तर दुसरा शेती व्यवसाय करतो. त्यास कुणाल आणि गौरव अशी दोन मुले असल्याने, जमीन न करता त्यांना उच्च शिक्षण देऊन अधिकारी बनविण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र नियतीने ते स्वप्न धुळीस मिळवले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू