शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
3
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
4
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
5
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
6
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
7
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
8
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
9
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
10
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
11
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
12
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
13
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
14
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
15
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
16
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
17
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
18
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
19
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
20
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप

नाशकात भाजलेल्या दोघा भावांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 01:47 IST

जुन्या नाशकातील वडाळा नाका भागात असलेल्या संजरी नगर येथील एका इमारतीत शुक्रवारी (दि. २) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अचानक घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत घरातील आठ लोक जखमी झाले होते, त्यापैकी रविवार दुपारपर्यंत एकाच कुटुंबातील चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी दोघा तरुण सख्ख्या भावांची प्राणज्योत मालवल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देमृतांची संख्या चार : गॅस सिलिंडरचा झाला होता स्फोट 

नाशिक : जुन्या नाशकातील वडाळा नाका भागात असलेल्या संजरी नगर येथील एका इमारतीत शुक्रवारी (दि. २) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अचानक घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत घरातील आठ लोक जखमी झाले होते, त्यापैकी रविवार दुपारपर्यंत एकाच कुटुंबातील चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी दोघा तरुण सख्ख्या भावांची प्राणज्योत मालवल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अन्य जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.  इगतपुरीवाला चाळीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या संजरी नगर सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक ७ मध्ये राहणाऱ्या सैय्यद कुटुंबियांच्या घरी शुक्रवारी रात्री घरगुती गॅस सिलिंडर बदलताना गळती होऊन स्फोट झाल्याची दुर्घटना घडली होती.  घरातील सिलिंडर रिकामे झाल्याने दुसरे सिलिंडर बसवत असताना रेग्युलेटर लावण्याचा प्रयत्न केला असता, सिलिंडरमधून गॅसची वेगाने गळती होऊ लागली यामुळे घरातील पुरुषांनी सिलिंडर पेटू नये म्हणून जवळच पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये फेकले. यावेळी सिलिंडरमधील गॅस अचानकपणे सर्व घरात पसरला आणि मोठा स्फोट होऊन फ्लॅटमध्ये आगीचा भडका उडाल्याची प्राथमिक माहिती सुत्रांकडून देण्यात आली होती.आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत तत्काळ घरातील महिला, मुलांना जखमी अवस्थेत बाहेर काढून एका लहान टेम्पोतून तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबासह घटनास्थळी येत तत्काळ पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले.शनिवारी (दि. ३) रात्री उशिरापर्यंत उपचारादरम्यान नसरीन नुसरद सय्यद (२५),  सईदा शरफोद्दीन सैयद (४९) या नणंद-भावजयीचा मृत्यू झाला तर रविवारी नसरीनचा पती नुसरद रहीम सैय्यद आणि त्याचा सख्खा भाऊ लियाकत रहीम सय्यद यांचाही दुर्दैवाने मृत्यू झाला. नुसरद ६३ तर लियाकत २७ टक्क्यांपर्यंत भाजला होता तर नणंद-भावजयी ९५ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात भाजल्या होत्या. शोएब अन्सारी हा तरुणही ९० भाजला  आहे.सय्यद कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगरजुन्या नाशकातील संजरी नगर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सय्यद कुटुंबियांवर या दुर्घटनेमुळे दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेत सय्यद कुटुंबाने आपल्या दोन तरुण मुलांसमवेत मुलगी व सुनेला कायमचे गमावले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी नणंद-भावजयीच्या मृतदेहांचा शोकाकुल वातावरणात दफनविधी होत नाही तोच रविवारी दोघा तरुण मुलांची प्राणज्योत उपचारादरम्यान मालवली. या घटनेने सय्यद कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. एकाच कुटुंबात लागोपाठ चार मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.या दुर्घटनेत सय्यद नुसरत रहीम (२५), शोएब वलिऊल्ला अन्सारी (२८), मुस्कान वलिऊल्ला सय्यद (२५), नसरीन नुसरद  सय्यद (२५), सईदा शरफोद्दीन सय्यद (४९), आरीफ सलीम अत्तार  (५३), सय्यद लियाकत रहीम (३२), रमजान वलिऊल्ला अन्सारी (२२) असे आठ जण भाजले होते. 

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू