शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात दोघा दुचाकीस्वारांनी गमावला प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 16:20 IST

दुभाजकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ....

ठळक मुद्देदुचाकी समोरच्या वाहनावर पाठीमागून आदळलीदुभाजकावर दुचाकी आदळून अपघात

नाशिक : दुभाजकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना पेठरोडवरील शनिमंदिर चौक परिसरात घडली. भूषण शिवाजी अहिरे (३८, रा. म्हसरूळ) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अहिरे हे शुक्रवारी (दि.३०) त्यांच्या दुचाकीने (एमएच ४१, झेड ८५७५) पेठ नाक्याकडून आरटीओ कार्यालयाच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात अहिरे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत. दुसरी घटना नाशिकरोड ते उपनगर दरम्यान घडली. भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एका १९ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यश देवीदास कोकाटे (१९, रा. गोरेवाडी) हा युवक गुरुवारी (दि.२९) त्याच्या ताब्यातील दुचाकी (एमएच १५, सीएफ १५३८) वर जात होता. अचानक त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्यावरील समोरच्या वाहनावर पाठीमागून आदळली. या अपघातात यश याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातNashikनाशिक