शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

जिल्ह्यात पुन्हा अडीच हजार कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 01:23 IST

जिल्ह्यात  कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम असून  कोरोनाचा विळखा शहरासह ग्रामीण भागातही अधिकाधिक घट्ट होत आहे. मंगळवारी (दि.२३) दिवसभरात पुन्हा २ हजार ६४४ कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात आढळून आले. सलग चार दिवसांपासून नाशकात दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण येत असून त्यामुळे चिंता कायम आहे.

ठळक मुद्देपंधरा मृत्युमुखी : २ हजार रुग्ण कोरोनामुक्त

नाशिक : जिल्ह्यात  कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम असून  कोरोनाचा विळखा शहरासह ग्रामीण भागातही अधिकाधिक घट्ट होत आहे. मंगळवारी (दि.२३) दिवसभरात पुन्हा २ हजार ६४४ कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात आढळून आले. सलग चार दिवसांपासून नाशकात दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण येत असून त्यामुळे चिंता कायम आहे.नाशिकमध्ये अचानकपणे मागील पंधरवड्यापासून कोरोनाचा कहर झालेला पाहावयास मिळत आहे. आधी एक हजारच्या पुढे नंतर दोन हजारांचा टप्पा आणि आता गेल्या तीन दिवसांपासून अडीच हजारांच्या वरच बाधित आढळत आहेत.  मंगळवारी (दि.२३) शहरात १ हजार ४८० कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले तर ग्रामीण भागात ८२७ आणि मालेगावात २५९ कोरोनाचे रुग्ण आढळले. ७८ जिल्हा बाह्य कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. उपचार घेणाऱ्यांपैकी दिवसभरात १५ रुग्ण दगावले. यापैकी ९ ग्रामीण भागात तर सहा रुग्ण शहरी भागातील आहेत. तसेच २ हजार ३९३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा चढा आलेख कायम असून दाखल होणाऱ्या संशयित रुग्णांचीही संख्या दुसरीकडे वाढताना दिसत आहे. मंगळवारी दिवसभरात २ हजार ६४२ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. आतापर्यंत ४ हजार ८०६ रुग्णांचे नमुना चाचणी अहवाल प्रलंबित आहेत. सध्या जिल्ह्यात १७ हजार २२३ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आतपर्यंत कोरोनाने जिल्ह्यात २ हजार २४७ लोकांचा बळी घेतला आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे प्रशासकीय यंत्रणेचीही चिंता वाढत आहे. नागरिकांनी खबरदारी घेत नियमांचे पालन करण्यावर भर देण्याची गरज दिसू लागल्याने प्रशासकीय यंत्रणेचीही चिंता वाढू लागली आहे. नागरिकांनी खबरदारी घेत नियमांचे पालन करण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या