शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

विंचूरच्या शेतकऱ्याला अडीच लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 17:51 IST

विंचूर : जिल्ह्यात द्राक्ष बागायतदारांच्या फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहे. येथील ज्ञानेश्वर दत्तू जाधव या शेतकऱ्याला द्राक्ष व्यापाऱ्याने अडीच लाखांना गंडावले असून, याप्रकरणी शेतकऱ्याने पोलिसांत तक्रार दिली आहे. येथील ज्ञानेश्वर जाधव या शेतकऱ्याकडून पंजाब येथील अमितकुमार अर्जुनदेव या व्यापाऱ्याने अडीच लाखांच्या वर द्राक्ष माल घेऊन फसवणूक केल्याने तरुण शेतकरी संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देपोलिसांत तक्रार : परिसरातील अन्य जणांचीही फसवणूक; आर्थिक संकट

विंचूर : जिल्ह्यात द्राक्ष बागायतदारांच्या फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहे. येथील ज्ञानेश्वर दत्तू जाधव या शेतकऱ्याला द्राक्ष व्यापाऱ्याने अडीच लाखांना गंडावले असून, याप्रकरणी शेतकऱ्याने पोलिसांत तक्रार दिली आहे. येथील ज्ञानेश्वर जाधव या शेतकऱ्याकडून पंजाब येथील अमितकुमार अर्जुनदेव या व्यापाऱ्याने अडीच लाखांच्या वर द्राक्ष माल घेऊन फसवणूक केल्याने तरुण शेतकरी संकटात सापडला आहे.                                              जाधव यांच्या शेतातील थॉमसन हा द्राक्षमाल तयार असताना पंजाब येथील व्यापारी अमितकुमार अर्जुनदेव यांनी शेतात येऊन सौदा करून २८५० रु. क्विंटल या दराप्रमाणे द्राक्षमाल उचलला होता. अमितकुमार याने एकूण दोन लाख ५४ हजार ६२ रुपयांचा धनादेश जाधव यांना दिला. मात्र धनादेश बँकेत जमा केला असता परत आला. व्यापाऱ्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता मोबाइल बंद आला.

परिसरातील अन्य शेतकऱ्यांनीही संबंधित व्यापाऱ्याला द्राक्षमाल दिला होता. त्यांनीही संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. व्यापाऱ्याबरोबर अन्य एका स्थानिक व्यक्तीने पैशाची हमी दिली असल्याने त्याच्याशी संपर्क केला असता समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने जाधव यांनी पोलिसांत धाव घेतली. संबंधितांची चौकशी करून शेतमालाचे पैसे मिळावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पूर्ण वर्षाची कमाई गेल्याने औषध दुकानदाराचे तसेच बँकेचे कर्ज कसे फेडावे, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.दिघावकर यांच्याकडे तक्रारजाधव या शेतकऱ्याची परराज्यातील व्यापाऱ्याकडून फसवणूक झाल्याने शेतकऱ्यांमधून संतापाचे तसेच भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी शेतकऱ्याने विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापकुमार दिघावकर यांच्याकडेही तक्रार केली आहे. याच व्यापाऱ्याने परिसरातील अन्य शेतकऱ्यांकडूनही द्राक्षमाल घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे समजते. संबंधित व्यापाऱ्यावर गोंदेगाव येथील शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोठ्या कष्टाने व अपेक्षेने द्राक्षबाग उभी केली होती. आर्थिक फसवणूक झाल्याने औषध दुकानदाराचे व बँकेच कर्ज कसे फेडावे हा मोठा प्रश्न आहे. संबंधितांची चौकशी करून माझे पैसे मिळावे हीच अपेक्षा आहे.- ज्ञानेश्वर जाधव, शेतकरी, विंचूर

टॅग्स :FarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी