शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये अडीच लाख वाहने जिल्ह्यातून मार्गस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 00:26 IST

लॉकडाऊनच्या सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील २९ चेकपोस्टवरून सुमारे अडीच लाख वाहनांनी जिल्हात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. अर्थात यातील ९० ते ९५ टक्के वाहने ही केवळ जिल्ह्यात प्रविष्ट होऊन पुढील शहरासाठी रवाना झाली आहेत.

ठळक मुद्देचेकनाक्यांवरील नोंद : जिल्ह्यांच्या सीमारेषांवर स्थापन करण्यात आलेल्या २९ चेकपोस्टवर प्रवासी वाहनांची तपासणी

नाशिक : लॉकडाऊनच्या सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील २९ चेकपोस्टवरून सुमारे अडीच लाख वाहनांनी जिल्हात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. अर्थात यातील ९० ते ९५ टक्के वाहने ही केवळ जिल्ह्यात प्रविष्ट होऊन पुढील शहरासाठी रवाना झाली आहेत.जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाप्रशासनाने सर्वांत अगोदर जिल्ह्याच्या सीमा सिल करून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची आणि प्रवाशांची नोंद घेण्याचे काम हाती घेतले होते. यासाठी जिल्ह्यातील सीमारेषांवर विविध ठिकाणी २९ चेकपोस्ट उभारण्यात आले होते. चेकपोस्टवरून रवाना होणाºया वाहनांची माहिती संकलित करण्याचे काम चेकपोस्टवर करण्यात आले. त्यानुसार कठोर लॉकडाऊन ते लॉकडाऊन शिथिलतेपर्यंत जिल्ह्यात सुमारे दोन लाख ६५ हजार ३८७ वाहने प्रविष्ट झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.लॉकडाऊनच्या काळात अन्य जिल्ह्यांतील आणि राज्यांमधील अनेक वाहने नाशिक जिल्ह्यातून पुढच्या शहरात गेल्याची नोंद चेकपोस्टवर करण्यात आलेली आहे. इतर जिल्ह्यांतून प्रवासी पास घेऊन आलेल्या वाहनांची संख्या सर्वांत मोठी होती, तर विनापास जिल्ह्यात आलेल्या वाहनांवर रितसर कारवाईदेखील करण्यात आली. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी चेकपोस्टवर वाहनांमधील व्यक्तींची तपासणी करण्यात येऊन त्यांना पुढे मार्गस्थ करण्यात आले.सहा लाख प्रवाशांची नोंदलॉकडाऊनच्या शंभर दिवसांच्या कालावधीत बहुतांश वाहने ही केवळ नाशिक जिल्ह्यातून इतर शहरांसाठी रवाना झाली आहेत. मुंबई, पुणे, गुजरात आणि मध्य प्रदेशकडे जाणाºया वाहनांची संख्या अधिक आहे. सुमारे अडीच लाख वाहनांमधून ६ लाख ३१ हजार ६३७ इतकी माणसे या वाहनांतून रवाना झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे.४लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यांतर्गत तसेच जिल्हाबाहेर येणाºया जाणाºया वाहनांवर निर्बंध आले असले तरी सुरूवातीच्या काळात चेकपोस्टवरून सर्वाधिक वाहने मार्गस्थ झाली. लॉकडाऊनमध्ये निर्बंध आल्यानंतर मोठ्या प्रमाणात पासधारक वाहने जिल्ह्यातून गेली.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस