शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडजवळ अंगठ्या सुळक्यावरून पडून अहमदनगरच्या दोन ट्रेकर्सचा मृत्यू, एक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 23:49 IST

इतर १३ ट्रेकर्स सुखरूप असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून मिळाली आहे. 

 नाशिक: जिल्ह्यातील मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अंगठ्या डोंगरावरून आज सायंकाळच्या सुमारास प्रस्तरारोहण करताना खाली पडून अहमदनगर येथील दोन ट्रेकर्सचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला असून इतर १३ ट्रेकर्स सुखरूप असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून मिळाली आहे. 

हा डोंगर हा चांदवड तालुक्यातील असून सायंकाळच्या सुमारास घटना घडल्यामुळे अंधारामुळे दुसरा मृतदेह शोधण्यास मदतकार्याला मोठा विलंब झाला व अडथळाही येत होता. रात्री उशिरा येथील उपजिल्हा रुग्णालयात जखमी ट्रेकर्सला आणण्यात आले. अहमदनगर येथील इंद्रप्रस्थ ट्रेकर्स ग्रुपच्या ८ मुली आणि ७ मुले अशी १५ जणांची टीम आठ दिवसांचे नियोजन करुन आज सकाळी ट्रेकिंग करण्यासाठी मनमाडनजीक असलेल्या हळबीची शेंडी अर्थात अंगठ्या डोंगरावर आले होते. हे सर्वजण अंगठ्या डोंगरावर चढले. तेथून पुढे अंगठ्याच्या आकाराच्या सुळक्यावर त्यांनी यशस्वी चढाई केली. 

त्यासाठी त्यांनी खिळ्यांच्या साहाय्याने रोपवे बांधला होता. यशस्वी चढाईनंतर हे सर्व ट्रेकर्स खाली उतरत होते. दोन पट्टीचे ट्रेकर मयूर दत्तात्रेय म्हस्के (२४) व अनिल शिवाजी वाघ (३४) हे मामा-भाचे हे सर्वात शेवटी होते. रोप-वे वरून खाली येत असताना व या रोपवेचे खिळे काढत असताना हे दोघेही व प्रशांत पवार अन्य एक सुळक्यावर खाली पडले.

या घटनेमुळे १३ ट्रेकर्समध्ये खळबळ उडाली. ते घाबरून गेले. कसेबसे त्यांनी जखमींना डोंगरावरून खाली आणण्याचा प्रयत्न केला. तेथील ग्रामस्थही मदतीला धावले. रात्री उशिरा जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी मनमाडकरही मदतीला धावले. प्रभारीपोलीस अधिकारी पी.बी. गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत घटनेची माहिती घेतली. 

टॅग्स :Nashikनाशिक