शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

दोनशे वादकांनी तासभर नाचविले २०१ ध्वज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:54 IST

नाशिक : ‘ढोलवादन’ नाशिकची ओळख बनत चालली आहे. शहरात विविध ढोल पथके कार्यान्वित असून, यामध्ये युवक-युवतींचा वादक म्हणून सहभाग आहे. विविध सण-उत्सवांप्रसंगी ढोल पथकांकडून एकापेक्षा एक पारंपरिक ताल वाजवून वातावरणात वेगळाच रंग भरला   जातो.  गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात बाप्पांच्या भक्तीत ढोलवादकांचा असाच सळसळता उत्साह रविवारी (दि.१६) नाशिककरांनी अनुभवला. २०१ ध्वज तासभर ...

नाशिक : ‘ढोलवादन’ नाशिकची ओळख बनत चालली आहे. शहरात विविध ढोल पथके कार्यान्वित असून, यामध्ये युवक-युवतींचा वादक म्हणून सहभाग आहे. विविध सण-उत्सवांप्रसंगी ढोल पथकांकडून एकापेक्षा एक पारंपरिक ताल वाजवून वातावरणात वेगळाच रंग भरला   जातो.  गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात बाप्पांच्या भक्तीत ढोलवादकांचा असाच सळसळता उत्साह रविवारी (दि.१६) नाशिककरांनी अनुभवला. २०१ ध्वज तासभर दोनशे वादकांनी नाचवित नवा विक्रम रचला.  निमित्त होते, नटनाद ढोल-ताशा पथक, नवीन आडगाव नाका सांस्कृतिक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तासभर २०१ ध्वज नाचविण्याच्या विक्रमपर उपक्रमाचे. मागील दोन वर्षांपासून हे ढोलपथक दिंडोरीरोडवर मागील दोन वर्षांपासून सराव करीत आहेत. पथकात सुमारे २०० वादक असून या वादकांसह मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ध्वज नाचविण्याच्या उपक्रमात सहभागी होत जिनियस व वंडर बूकमध्ये विक्रम नोंदविला.  हिदू संस्कृतीचा मान असलेल्या २०१ ध्वजांना ढोल-ताशांच्या विविध तालांवर सुमारे तासभर नाचवित वादक व कार्यकर्त्यांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी ६२ वादकांनी ढोल-ताशांचे वादन केले. यामध्ये ५१ ढोल तर ११ ताशांचा समावेश होता. गणेशोत्सवानिमित्त लाडक्या बाप्पांना या उपक्रमाद्वारे आगळावेगळा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. ‘नाशिक ढोल’ देशभर प्रसिद्ध असून, येथील ढोलवादनाच्या परंपरेने विक्रम नोंदविल्याने आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक शाहू खैरे, कविता कर्डक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी, समाधान जाधव आदी उपस्थित होते.मुंबई-पुणेकरांचा विक्रम मोडितढोल-ताशांच्या तालावर थिरकत तरुणाईकडून सलग तासभर ध्वज नाचविण्याचा विक्रम यापूर्वी मुंबई-पुणेकरांच्या नावावर आहे. मुंबईत तरुणाईने १७१ ध्वज नाचविले होते, तर पुण्यात १०१ ध्वज नाचवून विक्रम केल्याची नोंद आहे. मात्र नाशिककर ढोल-ताशा वादकांनी मुंबई-पुण्याच्या हा विक्रम मोडित काढत २०१ ध्वज सलग तासभर नाचवून नवा विक्रम रचला. हा विक्रम बघण्यासाठी नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. केवळ ढोलवादनच नव्हे तर लयबद्ध व तालबद्ध पद्धतीने ढोल-ताशांचा आवाज यावेळी घुमत होता. आगळ्यावेगळ्या पारंपरिक तालावर वादन करत वादकांनी व ध्वजधारी युवकांनी लक्ष वेधून घेतले.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवNashikनाशिक