आज परीक्षेचा शेवट नाशिक : महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येत असलेल्या टायपिंगच्या परीक्षेसाठी जिल्ात १९ हजार ७३७ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत़ गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या परीक्षेचा उद्या शेवटचा दिवस आहे़ जिल्ातील १३ परीक्षा केंद्रांवर चार सत्रांत ही परीक्षा चालू आहे़ या परीक्षेची शहरात सात केंद्रे, तर ग्रामीण भागात मालेगाव येथे दोन, तर इगतपुरी, सटाणा, पिंपळगाव, सिन्नर आदि ठिकाणी प्रत्येक एक अशी सहा केंद्रे आहेत़ २८ मेपासून ही परीक्षा सुरू झाली असून, यामध्ये इंग्रजी टायपिंगचे ३०, ४०, ५०, ६०, मराठी ३०, ४०, हिंदी ३०, ४० प्रति शब्द प्रति मिनिट वेग अशा परीक्षा होत आहेत, तर ३६५ विद्यार्थी लघुलेखनाचे आहेत़ चार दिवसांपासून प्रत्येक केंद्रावर ९ ते १०, ११ ते १२, २ ते ३, ४ ते ५ अशा एक-एक तासाच्या सत्रात परीक्षा होत आहेत़ शनिवारी (दि़ ३१) परीक्षा संपणार आहेत, अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांनी दिली़
टायपिंग परीक्षेसाठी वीस हजार विद्यार्थी
By admin | Updated: May 31, 2014 00:25 IST