शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

हिरावाडीत चंपाषष्ठीनिमित्त  बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:12 IST

हिरावाडी गावठाण (शक्तिनगर) येथे गुरुवारी (दि. १३) चंपाषष्ठीनिमित्त शिव मल्हार मित्रमंडळाच्या वतीने बारा गाड्या ओढण्याचा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी साडेसातला अमित देवकर यांच्या हस्ते पूजन व महाआरती होईल.

पंचवटी : हिरावाडी गावठाण (शक्तिनगर) येथे गुरुवारी (दि. १३) चंपाषष्ठीनिमित्त शिव मल्हार मित्रमंडळाच्या वतीने बारा गाड्या ओढण्याचा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी साडेसातला अमित देवकर यांच्या हस्ते पूजन व महाआरती होईल.  सकाळी ९ वाजता गंगाघाटावरील खंडेराव महाराज मंदिर येथून सवाद्य मिरवणुकीला प्रारंभ होईल. ही मिरवणूक पुढे सरदारचौक, काळाराम मंदिर परिसर, नाग चौक, गजानन चौक, संजयनगरपर्यंत काढण्यात येईल, त्यानंतर पालखी विसावा व पुढे आडगाव नाक्यामार्गे हिरावाडी शक्तिनगरपर्यंत काढण्यात येईल.शक्तिनगर येथे महाप्रसादाचे वाटप केले जाईल. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ७ वाजता खंडेराव महाराज मिरवणूक होणार आहे. या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित राहणार असून, भाविकांनी यात्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिव मल्हार मित्रमंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष उदय गांगुर्डे, अध्यक्ष गणेश आंबेकर, सुनील घुटेकर, सागर आवारे, अर्जुन वायकळे आदींनी केले आहे.अमृतधाम विडी कामगारनगर येथील शिवाजी चौकात श्रीमंत खंडेराव महाराज देवस्थानच्या वतीने चंपाषष्ठीनिमित्त गुरुवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता कावड त्यानंतर कैलास शिंदे यांच्या हस्ते अभिषेक व महाआरती, सायंकाळी पालखी मिरवणूक, रात्री ९ वाजता आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते महाआरती व त्यानंतर १० वाजता जागरण गोंधळ तसेच पहाटे ५ वाजता लंगर तोडण्याचा कार्यक्रम होणार असून, कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन शशिकांत राऊत, संजय लोंढे, यांनी केले आहे.  पेठरोडवरील जय मल्हार सेवाभावी संस्थेच्या वतीने यंदाही दरवर्षीप्रमाणे चंपाषष्ठीनिमित्त खंडेराव महाराज यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, मल्हारी राजा देवस्थान येथे चंपाषष्ठीनिमित्त पालखी सोहळा, दशावतार (बोहडा), जागरण गोंधळ व भंडाऱ्याचा कार्यक्रम होईल. यात्रोत्सवानिमित्त खंडेराव महाराज यांचा बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे.आजपासून टेकडीवर खंडोबाची यात्राचंपाषष्ठीनिमित देवळाली कॅम्प येथील खंडेराव टेकडी येथे गुरुवारपासून यात्रोत्सव साजरा करण्यात येणार असून, त्या निमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने पिवळ्या पताकांनी मंदिर परिसर झळाळून निघाला आहे. भक्तांची गुरुवारी बेल-भंडारा उधळीत देवाची तळी भरण्यासाठी येथे सकाळपासून गर्दी होणार आहे. मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी साप्तमिक पूजाविधी होणार असल्याचे मंदिराचे पुजारी प्रकाश आमले यांनी सांगितले. त्यानंतर दुपारी ३ वाजता आमले परिवाराच्या भगूर येथील निवासस्थानापासून झेंडकाठी व पालखी मिरवणूक काढण्यात येऊन ती देवळाली शहरमार्गे खंडेराव टेकडी येथे आणण्यात येईल.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक