शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे बाराशे लाभार्थी बोगस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 10:06 PM

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तालुक्यातील १ हजार २०१ लाभार्थी बोगस (अपात्र) आढळून आले आहेत. त्यांच्याकडून ९८ लाख ४२ हजार एवढी लाभाची रक्कम वसूल केली जाणार आहे. यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी दिली आहे. 

मालेगाव : पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तालुक्यातील १ हजार २०१ लाभार्थी बोगस (अपात्र) आढळून आले आहेत. त्यांच्याकडून ९८ लाख ४२ हजार एवढी लाभाची रक्कम वसूल केली जाणार आहे. यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी दिली आहे. केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ प्रति २ हजार रुपये रक्कम देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार वर्षाला ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत. गेल्या २ वर्षांपासून ही योजना सुरू झाली आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थी शेतकरी असला  पाहिजे. पती-पत्नी व १८ वर्षांखालील अपत्य असणे गरजेचे आहे.  शासकीय नोकरीत नको, अशा लाभार्थींना या योजनेचा लाभ दिला गेला. मात्र तालुक्यातील १ हजार २०१ लाभार्थींच्या कुटुंबात आयकर भरणारी व्यक्ती आढळून आली आहे. तसेच शासकीय नोकरीत असलेल्या शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी गंभीर दखल घेतली असून, या अपात्र लाभार्थींकडून रक्कम वसुलीचे आदेश दिले आहेत. लाभ घेतलेल्या अपात्र शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयातील कक्षात पैसे जमा करावेत, असे आवाहन केले आहे. तसे न केल्यास त्यांच्याकडून सक्तीची वसुली केली जाणार आहे. ७/१२ उताऱ्यावर बोजा चढविण्याचेही आदेश तहसीलदार राजपूत यांनी दिले आहेत. मालेगाव तालुक्यात सध्या ५४ हजार २८४ शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ दिला जात आहे. या योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी तलाठी व तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार राजपूत यांनी केले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी