शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

कोरोनाबाधितांसाठी सिन्नरच्या कोवीड उपजिल्हा रुग्णालयात बसवले टीव्ही संच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 2:41 PM

सिन्नर : येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या कोवीड-१९ डेडीकेटेड केअर सेंटरमध्ये उपचार घेर्णा­या कोरोना बाधित रुग्णांच्या मनोरंजनासाठी तसेच त्यांना उपचाराच्या काळात योग आणि प्राणायामाचे बसल्या जागेवर धडे मिळण्यासाठी प्रत्येक वार्डात टेलिव्हिजन संच बसविण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे पहिल्या आणि दुर्स­या मजल्यावरील वार्डांमध्ये दहा टेलिव्हिजन संच बसवण्यात आले

सिन्नर : येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या कोवीड-१९ डेडीकेटेड केअर सेंटरमध्ये उपचार घेर्णा­या कोरोना बाधित रुग्णांच्या मनोरंजनासाठी तसेच त्यांना उपचाराच्या काळात योग आणि प्राणायामाचे बसल्या जागेवर धडे मिळण्यासाठी प्रत्येक वार्डात टेलिव्हिजन संच बसविण्यात आले आहेत.बाधितांची काळजी घेण्यासाठी तसेच त्यांना आजारपणातून लवकर मुक्ती मिळण्यासाठी अशा प्रकारे उपक्रम राबवणारे सिन्नरचे उपजिल्हा रुग्णालय जिल्'ात एकमेव ठरले आहे. पहिल्या आणि दुर्स­या मजल्यावरील वार्डांमध्ये दहा टेलिव्हिजन संच बसवण्यात आले असून एक-दोन दिवसांत ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. निर्मला गायकवाड यांनी दिली. योगा इंस्ट्रक्टरच्या माध्यमातून बाधित रुग्णांना आपल्या वार्डात असलेल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर मार्गदर्शन केले जाणार आहे. योगाचे प्रशिक्षण, प्राणायम याबरोबरच मनोरंजनासाठी आणि रुग्णांना वेळोवेळी औषधोपचाराच्या सूचना देण्यासाठी टेलिव्हिजन संचाचा उपयोग होणार आहे. उपजिल्हा रुग्णालयात सेंट्रलाइझ आॅक्सिजन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे एकाच वेळी ३५ बेडला आॅक्सिजन पुरवठा करण्यात येत आहे. यंत्रणेसाठी अलार्म सिस्टिम असल्याने सिलिंडर संपण्यापूर्वीच त्याचा सिग्नल मिळतो. साहजिकच रुग्णांना अखंडितपणे आॅक्सिजन पुरवठा करणे सोपे झाले आहे. दरम्यान, शासनाकडून उपजिल्हा रुग्णालयात जोखमीच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटर यंत्रणा’ प्राप्त झाली आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षित तज्ञ डॉक्टर्स आणि इतर स्टाफ उपलब्ध नसल्याने यंत्रणा कार्यान्वित करण्यात अडचण निर्माण झाली आहे. त्यासाठी शासनस्तरावर उपजिल्हा रुग्णालयाकडून पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. सिन्नर तालुक्यात आतापर्यंत ६०२ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. रुग्णालयातील डॉक्टरांकडून शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे होणारे उपचार, वेळेवर दिला जाणारा संतुलीत आहार, रुग्णांना योग्य मार्गदर्शन आणि मानसिक आधाराच्या बळावर आतापर्यंत ४४३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्के आहे. आतापर्यंत १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदराचे प्रमाण २.६५ टक्के असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, अधीक्षिका डॉ. निर्मला गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याTV Celebritiesटिव्ही कलाकार