शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

कांद्याच्या आगारात कोट्यवधींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:18 IST

सिन्नर (शैलेश कर्पे) : कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्यात दरवर्षी सुमारे तीन ते सव्वातीन हजार हेक्टरवर कांदा ...

सिन्नर (शैलेश कर्पे) : कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्यात दरवर्षी सुमारे तीन ते सव्वातीन हजार हेक्टरवर कांदा लागवड केली जाते. अवर्षणग्रस्त तालुका असला तरी विहिरींच्या पाण्यावर तालुक्यातील चोहोबाजूंना कांद्याची लागवड केली जाते. दरवर्षी कांदा या नगदी पिकातून सिन्नरच्या शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. सिन्नरच्या उन्हाळ कांद्याची परदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते. रंग, आकार, वजन व गुणवत्तेत सिन्नरचा कांदा बाजारपेठेत भाव खाऊन जातो.

सिन्नर तालुक्यात पाण्याचा शाश्वत स्रोत नसल्याने नगदी पिके फारशा प्रमाणात नाहीत. कडवा कालवा व गोदावरी उजवा कालवा काही भागातून जात असला तरी तालुक्यातील बहुतांश भाग हा पावसाच्या पाण्यावर व विहिरींच्या भरवशावर अवलंबून आहे. तालुक्यात गहू, हरभरा, ऊस व कांदा ही नगदी पिके घेतली जात असली तरी कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा मोठ्या प्रमाणात आहे.

तालुक्यात सुमारे पाच हजार हेक्टरवर गहू, सुमारे ४ हजार हेक्टरवर हरभरा तर केवळ ६०० ते ७०० हेक्टरवर ऊस या नगदी पिकांची लागवड केली जाते. कांदा लागवड तीन हजार हेक्टरवर होते. मात्र, कांद्यापासून शेतकऱ्यांची मोठी आर्थिक उलाढाल होत असते. लाल कांदा टिकावू नसल्याने शेतकरी उन्हाळ कांदा लागवडीला महत्त्व देतात.

सध्या उन्हाळ कांद्याला बाजारपेठेत १३०० ते १७०० पर्यंत भाव सुरू आहे. या भावाने कांदा विक्री झाल्यास शेतकऱ्यांना तो परवडतो. अनेकदा शेतकऱ्यांनी कांद्याचे निच्चांकी भाव तर कधी उच्चांकही अनुभवला आहे. मात्र, कांदा पिकातून शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा असल्याने कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असतो.

कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांना सहजासहजी बाजारपेठा उपलब्ध आहेत. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सिन्नर मुख्य आवार, नायगाव व वडांगळी या तीन बाजारात मोकळ्या कांद्याची खरेदी केली जाते. तर नांदूरशिंगोटे, दोडी, पांढुर्ली या तीन उपबाजारात कांद्याचा गोणीतून लिलाव केला जातो. कांदा विक्रीसाठी सहजासहजी बाजारपेठ उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना विक्रीसाठी दळणवळणाचा फारसा खर्च येत नाही. त्यामुळे कांदा पीक घेणे व विक्री करणे शेतकऱ्यांना परवडते.

-----------------

तीन हजार कांदा चाळी

सिन्नर तालुक्यात चाहोबाजूंना कांदा लागवड केली जाते. त्यामुळे पिकाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात येते. अर्धा तासाच्या अंतरावर बाजारपेठ असल्याने शेतकऱ्यांना वाहतूक परवडते. असे असले तरी शेतकरी बाजारभाव चांगला असेल तरच कांदा विक्रीसाठी नेतात. अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुमारे ३ हजार कांदा चाळीची निर्मिती केली आहे. बाजारभाव नसल्यास शेतकरी कांदा चाळीत कांदा साठवून ठेवतात. योग्य भाव आल्यानंतरच शेतकरी कांदा विक्रीसाठी बाहेर काढतात. कांदा नाशवंत असला तरी उन्हाळ कांदा हा कांदा चाळीत टिकतो. त्यामुळे शेतकरी योग्य भावाच्या प्रतीक्षेत असतात.

------------------------

कोलंबो, बांगलादेश, नेपाळसह दुबईला निर्यात..

सिन्नर तालुक्यात कांद्याला पोषक वातावरण आहे. त्यामुळे तालुक्यातील कांद्याला चांगला रंग, आकार, वजन आणि गुणवत्ता असते. त्यामुळे सिन्नरच्या व्यापारांकडून खरेदी करण्यात आलेला उच्च प्रतीचा कांदा कोलंबो, बांगलादेश, नेपाळ, दुबई, कतार, ओमान येथे निर्यात केला जातो. खरेदी केलेला कांदा कंटेनरने मुंबईला जातो. जहाजाद्वारे विविध देशात कांदा पोहोच केला जातो. तर नेपाळ आणि बांगलादेशला ट्रकद्वारेही कांदा पाठविला जातो.

----------------------

कांदा पीक विम्याकडे दुर्लक्ष

सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक उलाढाल कांदा पिकावर अवलंबून असली तरी कांद्याचा पीक विमा काढण्याकडे शेतकरी दुर्लक्ष करतात. अर्थात कांदा पीक विम्याचा प्रीमियम मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे आधीच्या कांदा लागवडीवर मोठा खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांकडून पीक विमा काढण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचे चित्र आहे.

-------------------

070921\07nsk_1_07092021_13.jpg

०७ सिन्नर ओनियन