शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम मुंढे : पुढील दौरा पुर्वकल्पना देणारा नसेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 21:22 IST

‘आज सर्वांना कल्पना देऊन पाहणी केली, यानंतर अचानक दौरा करेल, तेव्हा चित्र बदललेले असावे’, अशी तंबी देत सर्वच विभागप्रमुखांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फैलावर घेतले.

ठळक मुद्दे मोडकळीस आलेल्या खेळण्या बघून मुंढे यांचा पारा चढलाफुटलेले पथदीवे, तुटलेल्या खेळण्या, गाजरगवताचे पसरलेले साम्राज्य

नाशिक : शहराच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक असलेले महापालिकेने विकसित केलेले फाळके स्मारक, बुद्धस्मारक परिसराची झालेली दुरवस्था बघून महापालिकेचे प्रशासनप्रमुख हतबल झाले. ‘आज सर्वांना कल्पना देऊन पाहणी केली, यानंतर अचानक दौरा करेल, तेव्हा चित्र बदललेले असावे’, अशी तंबी देत सर्वच विभागप्रमुखांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फैलावर घेतले.वनमहोत्सवांतर्गत वृक्षलागवडीच्या शुभारंभाच्या निमित्ताने मुंढे यांनी फाळके स्मारकाच्या आवारात हजेरी लावली. वडाचे रोपटे लावल्यानंतर उद्यानविभागाच्या कर्मचा-यांनी बुद्धस्मारक व फाळके स्मारकाच्या आवारात वृक्षारोपण पूर्ण केले. मुंढे यांनी मुख्यालयातील विविध विभागांचे अधिकारी, विभागीय अधिका-यांना बोलावून घेत फाळके स्मारक व बुद्ध स्मारकाचा परिसर पिंजून काढला. यावेळी फाळके स्मारकातील बालोद्यानाची झालेली दुरवस्था आणि मोडकळीस आलेल्या खेळण्या बघून मुंढे यांचा पारा चढला. तसेच वॉटरपार्कचे प्रवेशद्वार उघडताच परिसरात प्रवेश केला असता त्यामधील विदारक चित्राने त्यांना धक्का बसला. खासगी तत्त्वावर प्रस्ताव तयार करून वॉटरपार्कचा दर्जा सुधारून कार्यान्वित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्याचे समजते. दरम्यान, या परिसराला सार्वजनिक अस्वच्छतेमुळे आलेल्या बकालपणाविषयीही त्यांनी नाराजी दर्शविली. फुटलेले पथदीवे, तुटलेल्या खेळण्या, गाजरगवताचे पसरलेले साम्राज्य, सार्वजनिक स्वच्छतागृहाची झालेली दुर्दशा, फुलझाडे, शोभिवंत झाडांभोवती साचलेला कचरा व वाढलेले गवत अशा एक ना अनेक समस्यांचे गलिच्छ चित्राने जणू महापालिकेच्या गलथान कारभाराचा आरसाच मुंढे यांना दाखविला. महापालिका प्रशासनप्रमुख या नात्याने फाळके स्मारकाची झालेली दुरवस्था बघून ते चांगलेच व्यथित झाले आणि संतापलेही. ‘यापुढे मी सांगून पाहणी दौरा करणार नाही, तर अचानक भेट देईल, त्यावेळी मला अशी अवस्था दिसता कामा नये’ असे सांगून धारेवर धरले.

चित्र पालटेल, पुन्हा वाढतील पर्यटकतुकाराम मुंढे यांचा पाहणी दौ-यात दिलेल्या विकासाच्या सूचनांमुळे लवकरच फाळके स्मारकाचे चित्र पालटेल आणि पुन्हा पर्यटकांचा कल वाढेल, अशी चर्चा परिसरात रंगली होती. येथील पथदीपांपासून पाणपोई आणि स्वच्छतागृहांसह खेळण्यांच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. फाळके स्मारकाचे सौंदर्य लयास गेल्याने नाशिककरांनी या पर्यटनस्थळाकडे पाठ फिरविल्याने महापालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. मुंढे यांच्या पाहणी दौºयामुळे फाळके स्मारकाला पुन्हा वैभव प्राप्त होइल, अशी अपेक्षा नाशिककरांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका