शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम मुंढे  १५ दिवसांच्या रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:56 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे १५ दिवसांच्या रजेवर चालले असून, आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन हे शनिवारी (दि.२६) स्वीकारणार आहेत. सिडकोतील अतिक्रमणविरोधी कारवाईला द्यावी लागलेली स्थगिती आणि त्यापाठोपाठ आनंदवल्ली शिवारातील ग्रीनफिल्ड लॉन्सवरील कारवाईबाबत न्यायालयात मागावी लागलेली माफी यामुळे आयुक्त १५ दिवसांच्या रजेवर चालले असल्याची चर्चा सुरू झाली असताना, आयुक्तांनी मात्र, आपला रजेचा अर्ज पूर्वीच दिला असून, या घटना- घडामोडींशी त्याचा काही संबंध नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे.

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे १५ दिवसांच्या रजेवर चालले असून, आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन हे शनिवारी (दि.२६) स्वीकारणार आहेत. सिडकोतील अतिक्रमणविरोधी कारवाईला द्यावी लागलेली स्थगिती आणि त्यापाठोपाठ आनंदवल्ली शिवारातील ग्रीनफिल्ड लॉन्सवरील कारवाईबाबत न्यायालयात मागावी लागलेली माफी यामुळे आयुक्त १५ दिवसांच्या रजेवर चालले असल्याची चर्चा सुरू झाली असताना, आयुक्तांनी मात्र, आपला रजेचा अर्ज पूर्वीच दिला असून, या घटना- घडामोडींशी त्याचा काही संबंध नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे.  गेल्या तीन-साडेतीन महिन्यांपासून आपल्या धडाकेबाज कारवाईमुळे आयुक्त तुकाराम मुंढे चर्चेत आले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून सिडकोतील अनधिकृत बांधकामे हटविण्याचा प्रश्न तापण्यास सुरूवात झाली असताना महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बॅकफूटवर येत शुक्रवारी (दि.२५) वाढीव बांधकामांवर मार्किंगचे काम थांबविले. त्यानंतर, शुक्रवारीच उच्च न्यायालयात आनंदवल्ली शिवारातील ग्रीनफिल्ड लॉन्सवरील संरक्षक भिंतीचे बांधकाम स्थगिती आदेश असतानाही पाडण्यात आल्याने उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले आणि सदर बांधकाम पुन्हा बांधून देण्याचे आदेशित केले.   या चुकीबद्दल आयुक्तांना माफी मागावी लागली. लागोपाठच्या या घटनाघडामोडी घडत असतानाच शुक्रवारी आयुक्त मुंढे हे पंधरा दिवसांच्या रजेवर जाणार असल्याची वार्ता आली. त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात विचारणा केली असता, त्यांनी त्यास दुजोरा देत येत्या शनिवारी (दि.२५) जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे, मुंढे यांना रजेवर पाठविले गेल्याची चर्चा सुरू झाली. याबाबत खुद्द तुकाराम मुंढे यांच्याशीच संपर्क साधला असता, त्यांनी या चर्चा व्यर्थ असल्याचे सांगत आपण रजेचा अर्ज यापूर्वीच दिला असल्याचे स्पष्ट केले. हवे तर रजेच्या अर्जावरील तारीख बघून घ्या. आपल्या रजेचा संबंध या घटनाघडामोडींशी लावला जाऊ नये, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे