शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम मुंढेंचे ‘वॉक वीथ कमिशनर’ शीर्षक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 14:29 IST

मराठीची सक्ती : आयुक्त अंमलबजावणी करणार काय?

ठळक मुद्देनवी मुंबईच्याच धर्तीवर मुंढे यांनी नाशिकमध्येही गेल्या तीन आठवड्यापासून दर शनिवारी शहरातील जॉगिंग ट्रॅकवर ‘वॉक वीथ कमिशनर’ हा उपक्रम सुरूशासन व्यवहारात राजभाषा मराठीचा वापर अनिवार्य करतानाच वरिष्ठ अधिका-यांना कोणत्याही जाहीर कार्यक्रमात बोलताना मराठीचाच वापर बंधनकारक

नाशिक - महाराष्ट शासनाच्या मराठी भाषा विभागाने शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा वापर सक्तीचा करण्याचा निर्णय घेतल्याने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या ‘वॉक वीथ कमिशनर’ या उपक्रमाचे इंग्रजी शीर्षक अडचणीत सापडले आहे. मायमराठीचा जागर करणाऱ्या मनसेनेही या शीर्षकाबाबत हरकत घेत शासनाचा अधिकारी म्हणून आयुक्तांकडून या उपक्रमाचे मराठीकरण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे, आयुक्तांकडून शासन निर्णयाची अंमलबजावणी होईल काय, याकडे आता लक्ष लागून असणार आहे.विषय तसा किरकोळ परंतु, तो थेट मराठी माणसाच्या अस्मितेशी जोडला गेलेला असल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या ‘वॉक वीथ कमिशनर’ ह्या उपक्रमाचे शीर्षक त्यामुळे चर्चेत आले आहे. तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबईत आयुक्त असताना ‘वॉक वीथ कमिशनर’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्याठिकाणी सुमारे ३० हून अधिक उपक्रमात तीन हजाराहून अधिक तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. नवी मुंबईच्याच धर्तीवर मुंढे यांनी नाशिकमध्येही गेल्या तीन आठवड्यापासून दर शनिवारी शहरातील जॉगिंग ट्रॅकवर ‘वॉक वीथ कमिशनर’ हा उपक्रम सुरू केलेला आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित पहिल्याच उपक्रमाप्रसंगी आयुक्तांच्या मातोश्रींची प्रकृति बिघडल्याने केवळ तक्रारी स्वीकारण्यात आल्या होत्या. त्यावेळी, आयुक्तांनी काही मिनिटे हजेरी लावत इंग्रजीतूनच आपली अडचण विशद केली होती. त्यामुळे या उपक्रमाचे नेमके स्वरुप नागरिकांच्या लक्षात येऊ शकले नव्हते. दुस-यांदा पुन्हा त्याच मैदानावर आयोजित उपक्रमात मात्र स्वरूप समोर आले आणि ‘वॉक वीथ कमिशनर’ नव्हे तर ‘टॉक वीथ कमिशनर’ असे दर्शन घडले. दरम्यान, राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने आता शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा वापर अनिवार्य करतानाच वरिष्ठ अधिका-यांना कोणत्याही जाहीर कार्यक्रमात बोलताना मराठीचाच वापर बंधनकारक केलेला आहे. अन्यथा शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे आता आयुक्तांच्या ‘वॉक वीथ कमिशनर’ या इंग्रजी शिर्षकालाच धक्का पोहोचणार असल्याचे चर्चिले जात आहे. मनसेनेही त्याला आक्षेप घेतला आहे. शासनाचा जबाबदार अधिकारी म्हणून आयुक्तांकडून आता मराठी भाषेचा आदर राखून शीर्षकात बदल केला जातो किंवा नाही याकडे लक्ष लागून असणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे