शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रीमिअम दरवाढीस विरोध करणा-या नाशकातील भाजपा आमदाराच्या प्रतिमेला जोडे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 14:39 IST

शेतक-यांकडून निषेध : मनपाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित

ठळक मुद्देआमदार फरांदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी हिवाळी अधिवेशनात नाशिक मध्यच्या भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी सदर दरवाढीस विरोध करण्याची भूमिका घेत दरवाढीचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली होती

नाशिक - महापालिकेने इमारत बांधकामासंबंधी प्रीमिअम दरवाढीचा पाठविलेला प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. या प्रीमिअम दरवाढीस भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी विधानसभेत विरोध दर्शविल्याने त्याच्या निषेधार्थ शहर परिसरातील शेतक-यांनी शुक्रवारी (दि.२२) तपोवनातील साधूग्राममध्ये एकत्र येत आंदोलन केले. यावेळी शेतक-यांनी आमदार फरांदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. महाराष्ट्र शासनाने शासकीय दराच्या ४० टक्के प्रीमिअम दराने एफएसआय विकण्याची मुभा महापालिकेस दिल्याने परिणामी, आरक्षणाखाली जमिनी गेलेल्या शेतक-यांच्या टीडीआरचे मूल्य कोसळले आहे. त्यामुळे शेतकºयांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. त्यानंतर, महापालिका आयुक्तांनी  महाराष्ट्र शासनाकडे ७० ते ८० टक्के प्रीमिअम दरवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविलेला आहे. दरम्यान, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात नाशिक मध्यच्या भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी सदर दरवाढीस विरोध करण्याची भूमिका घेत दरवाढीचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली होती. आमदार फरांदे यांनी घेतलेल्या या भूमिकेच्या विरोधात शहर व परिसरातील शेतक-यांनी एकत्र येत तपोवनातील साधूग्राममध्ये आंदोलन केले आणि आमदार फरांदे यांचा निषेध केला. ‘प्रीमिअम वाढवा, शेतकरी वाचवा’ अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. आंदोलनात, शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर, केरू पाटील, राजाराम बोराडे, सोमनाथ बोराडे, छबुराव नागरे, बाळासाहेब विधाते, जयंत अडसरे, संजय पाटील, समाधान जेजुरकर, सुनील काठे, कुंदन मौले, ताराबाई मौले, महेंद्र जाधव, हिराबाई दातीर, विमल दातीर, भारती सरनाईक आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.‘जोडे मारो’चा प्रयत्नशेतकरी आंदोलकांनी आमदार देवयानी फरांदे यांची फ्लेक्सवर प्रतिमाही सोबत आणली होती. यावेळी प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी करताच पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रतिमा ताब्यात घेतली. त्यामुळे आंदोलकांचा प्रयत्न फसला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाFarmerशेतकरी