नाशिक : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने खरीप हंगामाच्या लागवडीसाठी तयारी व नियोजन सुरू केले आहे. यात नाशिक जिल्ह्णातील येवला, मालेगाव या तालुक्यांसह जळगाव, धुळे जिल्ह्यात खरीप प्रमुख नगदी पीक असलेल्या कपाशीवरीलशेंदरी बोंडअळीचे नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी एक जूननंतरच कापूस लागवड करावी यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे.घाऊक व किरकोळ विक्रेत्यांकडून एक जूनपूर्वी कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना कापसाच्या बियाण्यांची विक्री होणार याची खबरदारी घेण्याच्या सूचना कृषी विभागाने बियाणे उत्पादक कंपन्यांना केल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकºयांना बियाणेच १ जूननंतर उपलब्ध होणार असल्याने लागवडही एक जूननंतर होऊन शेंदरी बोंड अळीच्या प्रादुर्भावास आळा घालणे शक्य होईल, असा विश्वास कृषी विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. कापसाच्या हंगामपूर्व लागवडीमुळे शेंदरी बोंडअळीचा जीवनक्रम खंडित न झाल्याने अळीचा प्रादुर्भाव वाढतो.जीवनक्रम खंडित न झाल्यामुळे पुनर्उत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. त्यामुळे यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन महाराष्ट्रात हंगामपूर्व लागवडीचे प्रमाण अत्यल्प असले तरी कुठेही कापसाची हंगामपूर्व लागवड होऊन शेंदरी बोंड अळीला पोषक वातावरण निर्माण होऊ नये यासाठी २०१९ च्या खरीप हंगामात बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५ मे २०१९ पर्यंत के वळ घाऊक व्यापाºयांना किंवा जिल्हास्तरावरील कंपनीच्या गुदामापर्यंत बियाणे पोहोचविण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयातर्फे करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आतापर्यंत केवळ घाऊक व्यापारी अणि कंपन्यांच्या गुदामापर्यंतच बियाण्यांची वाहतूक झाली असून, बुधवार (दि.१५) पासून घाऊक व्यापाºयांकडून किरकोळ विक्रेत्यांपर्यंत बियाण्यांचा पुरवठा सुरू होणार आहे.१ जूनपूर्वी बियाणे विक्रीवर निर्बंधएक जूनपूर्वी कोणताही घाऊक अथवा किरकोळ विक्रेता शेतकºयांना बियाण्यांची विक्री करणार नाही याची दक्षता सर्व कापूस बियाणे उत्पादक कंपन्यांनी घ्यावी, अशा सूचना कृषी आयुक्तालयामार्फत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या खरीप हंगामात शेतकºयांना हंगामपूर्व लागवडीसाठी बियाणेच उपलब्ध होणार नसल्याने शेतकºयांना कापसाची लागवड एक जूननंतरच करावी लागणार आहे.
हंगामपूर्व लागवड टाळण्याचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:59 IST
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने खरीप हंगामाच्या लागवडीसाठी तयारी व नियोजन सुरू केले आहे. यात नाशिक जिल्ह्णातील येवला, मालेगाव या तालुक्यांसह जळगाव, धुळे जिल्ह्यात खरीप प्रमुख नगदी पीक असलेल्या कपाशीवरील शेंदरी बोंडअळीचे नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी एक जूननंतरच कापूस लागवड करावी यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे.
हंगामपूर्व लागवड टाळण्याचे प्रयत्न
ठळक मुद्देबोंडअळी नियंत्रण : १ जूननंतरच बियाणांचा पुरवठा करण्याच्या सूचना