सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीतून बुधवारी रात्री मालट्रक चोरीला गेल्याची घटना घडली. चालक बच्चीतारसिंग संधू यांनी भगवती कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ मालट्रक (एमएच १५ बीजे ९२५५) उभी केली होती. रात्री ११ वाजेच्या सुमारास चालक जेवणासाठी गेला होता. जेवण करून आल्यानंतर ट्रक जागेवर नव्हती. चौकशी केल्यानंतर ट्रक मिळून आली नाही. त्यानंतर ट्रक चोरीला गेल्याची फिर्याद एमआयडीसी पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक हरिभाऊ कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संगीता बाविस्कर अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)
माळेगाव औद्योगिक वसाहतीतून ट्रक चोरीस
By admin | Updated: July 1, 2016 00:25 IST