शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
2
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
3
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
4
मंदिरात फुलांच्या रांगोळीतून ऑपरेशन सिंदूर आणि भगवा ध्वज काढल्याने केरळमध्ये वाद, संघाच्या २७ स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल
5
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
6
खळबळजनक! ७ वर्षांच्या मुलाने चुकून घेतला ९ वर्षांच्या भावाचा जीव, खेळता खेळता काय घडलं?
7
धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
8
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
9
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
10
वय हरलं अन् स्वप्नं जिंकली! ३ गिर्यारोहकांचा अनोखा आदर्श, एव्हरेस्टवर फडकावला तिरंगा
11
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
12
येणं आनंदाचं, जाणं आशीर्वादाचं! गणराया, तू जाताना वेड लावून जातोस रे...
13
लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत दिसला जान्हवीचा बॉयफ्रेंड, गुलालाने माखला शिखर पहारीयाचा चेहरा, म्हणतो...
14
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
15
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
16
"नातवासाठी घेतलेल्या नवीन TESLA खेळण्याची किंमत किती आहे काका?", मराठी अभिनेत्याचा प्रताप सरनाईकांना टोला
17
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
18
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
19
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
20
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?

सवंदगाव फाट्यावर ट्रक खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:50 IST

मालेगाव मध्य : म्हाळदे शिवारातील सवंदगाव फाट्याजवळ सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ट्रकला आग लागून ट्रकमधील माल जळून खाक झाला. ...

ठळक मुद्देमालेगाव : अग्निशमन दलाच्या जवानांनी विझवली आग

मालेगाव मध्य : म्हाळदे शिवारातील सवंदगाव फाट्याजवळ सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ट्रकला आग लागून ट्रकमधील माल जळून खाक झाला. मनपाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंबाच्या साहाय्याने आग विझवली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात जळालेल्या ट्रकसंदर्भात तक्रार देण्यास कुणीच आले नसल्याने याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.महामार्गावरील सवंदगाव फाट्याजवळ लबैक हॉटेल येथे सकाळी मुंबईहून धुळ्याच्या दिशेने जाणारा ट्रक (क्र.एमएच ०४ ईवाय ८७७७) उभ्या असलेल्या ट्रकला आग लागल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी सदर घटनेची माहिती मनपाच्या अग्निशमन केंद्रास दिली.अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंबाद्वारे चार फेऱ्या करीत आगीवर नियंत्रण मिळविले. ट्रकमध्ये ट्रान्स्पोर्टचा विविध प्रकारचा माल व ट्रक जळून मोठे नुकसान झाले. मात्र या जळालेल्या ट्रकसंदर्भात सायंकाळपर्यंत कोणीही संपर्क साधला नसल्याने नुकसानीचा निश्चित आकडा मिळू शकला नाही. सायंकाळपर्यंत पवारवाडी पोलीस ठाण्यात याबाबत कुठलीच नोंद घेण्यात आली नव्हती.

टॅग्स :fireआग