शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची दुचाकीला धडक; दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 01:17 IST

मुंबई-आग्रा महामार्गावर सायने शिवारात हॉटेल अंबिका समोर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोन जण ठार झाले. याप्रकरणी तालुका पोलिसात टाटा ट्रक क्रमांक एमपी १४ एचबी ०८४४च्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर सायने शिवारात हॉटेल अंबिका समोर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोन जण ठार झाले. याप्रकरणी तालुका पोलिसात टाटा ट्रक क्रमांक एमपी १४ एचबी ०८४४च्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मोहंमद नईम मोहंमद सिद्दीकी (४७) रा. स. नं. १५, कमालपुरा यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली. ४ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. टाटा कंपनीचा ट्रक (क्रमांक एमपी १४ एचबी ०८४४) वरील चालकाने भरधाव वेगात वाहन चालवून दुचाकी क्रमांक एमएच ४१ एई ०५५२ ला धडक दिली. यात दुचाकीस्वार जुनेद नईम अहमद (२१) व त्याचा साथीदार समसुलहुदा मोहंमद आवान शहा (४५) रा. आझादनगर, धुळे हे दोघे गंभीर जखमी होऊन ठार झाले. दुकानात चोरीमालेगाव : शहरातील हारुण अन्सारी नगरातील ग. नं. २ मध्ये रात्री १० वाजेच्या सुमारास दुकानात जाऊन पैशांची मागणी करीत दमदाटी करून गल्ल्यातील रोकड चोरून नेल्याप्रकरणी शेख उमर शेख फारूख, रा. दातारनगर याच्या विरोधात पवारवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली. अल्ताफ अहमद मुश्ताक अहमद, रा. हारुण अन्सारी नगर, ग. नं. २ यांनी फिर्याद दिली. फिर्यादीच्या दुकानात आरोपी उमर शेख याने कटर दाखवून पैशांची मागणी केली. दमदाटी करून गल्ल्यातील १ हजार २०० रुपयांची रोकड घेऊन पळून गेला. शिवीगाळ, दमदाटी करून दुकानाचे नुकसान केले. अधिक तपास उपनिरीक्षक उगले करीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून किरकोळ चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.हाजी अहमदपुरा भागातून दुचाकीची चोरीमालेगाव : शहरातील हाजी अहमदपुरा भागातील घरासमोर लावलेली २५ हजार रुपये किमतीची दुचाकी क्रमांक एमएच ४१ एएल ५८३४ अज्ञात चोरट्याने चोरून नेली. १ जानेवारी राेजी पहाटे १ ते सकाळी पावणेआठ वाजेदरम्यान ही चोरी झाली. मोहंमद अर्शद अतहर हुसेन (२८) रा. प्लॉट नं. २५, हाजी अहमदपुरा यांनी रमजानपुरा पोलीसात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रोही करीत आहेत. 

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारी