शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

ट्रकच्या धडकेने दुचाकीवरील दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 00:53 IST

विंचूर : विंचूर-लासलगाव रस्त्यावरील मंजुळा पॅलेसच्या समोर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोन तरुण जागीच ठार झाले. दुचाकीला धडक दिल्यानंतर ट्रक रस्त्याच्या बाजूलाच शेतात असलेल्या शेतमजुराच्या घरात घुसल्याने चार जण जखमी झाले. विवेक दरेकर व शेखर रमेश गुंजाळ, अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

ठळक मुद्देविंचूर-लासलगाव रस्त्यावर भीषण अपघात

विंचूर : विंचूर-लासलगाव रस्त्यावरील मंजुळा पॅलेसच्या समोर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोन तरुण जागीच ठार झाले. दुचाकीला धडक दिल्यानंतर ट्रक रस्त्याच्या बाजूलाच शेतात असलेल्या शेतमजुराच्या घरात घुसल्याने चार जण जखमी झाले. विवेक दरेकर व शेखर रमेश गुंजाळ, अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.हनुमाननगर येथील विवेक कारभारी दरेकर (२८) व शेखर रमेश गुंजाळ (२६) हे दुचाकीवरून विंचूरकडून लासलगावकडे जात होते. त्याच वेळेस लासलगावकडून विंचूरच्या दिशेने भरधाव वेगाने येत असलेला ट्रक (एम एच १५ बी जे ६१५६) चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक बसताच विवेक दरेकर व शेखर गुंजाळ हे दोघेही जागीच ठार झाले.त्यानंतर ट्रक रस्त्याच्या बाजूला शेतात शेतमजुरांच्या घरावर जाऊन धडकला. त्यात आरती दीपक चव्हाण (१८), आकाश राजू मोरे (१४), निकिता ज्ञानेश्वर चव्हाण (१३), नितीन संदीप चव्हाण (१० महिने) हे जखमी झाले. तसेच घराबाहेर उभी असलेली जर्सी गाय ठार होऊन राहत्या घराचे व संसारोपयोगी वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ट्रकचालक मारुती रंगनाथ सुरासे(रा. देवठाण ता. येवला)विरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.आकाश गुंजाळ यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कोठाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक उदय मोहारे, पोलीस हवालदार राजेश घुगे, योगेश शिंदे, कैलास मानकर हे करीत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू