शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

यशस्वी करिअरसाठी त्रिसूत्रीची आवश्यकता - अविनाश धर्माधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:00 IST

‘स्व’ची ओळख, त्यानुसार कामाच्या क्षेत्राची निवड आणि निवड केलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत होण्यासाठी तपश्चर्या करण्याची तयारी या त्रिसूत्रीच्या जोरावर यशस्वी करिअर करता येते, असे प्रतिपादन चाणक्य मंडळ परिवारचे संस्थापक संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी केले़

नाशिक : ‘स्व’ची ओळख, त्यानुसार कामाच्या क्षेत्राची निवड आणि निवड केलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत होण्यासाठी तपश्चर्या करण्याची तयारी या त्रिसूत्रीच्या जोरावर यशस्वी करिअर करता येते, असे प्रतिपादन चाणक्य मंडळ परिवारचे संस्थापक संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी केले़ दादासाहेब गायकवाड सभागृहात ‘दहावी-बारावीनंतर काय’ या विषयावर आयोजित व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते़  करिअरबाबत अधिक मार्गदर्शन करताना धर्माधिकारी यांनी सांगितले की, केवळ डॉक्टर, इंजिनिअर होणे म्हणजेच करिअर नव्हे, तर त्यांनी त्यांच्या क्षेत्रात उत्तम व प्रतिभावंत असणे म्हणजे करिअर होय़ नृत्य, संगीत, शेती, अभिनय, खेळ अशी करिअरचीवेगवेगळे क्षेत्र असून, यामधील सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन हे त्यांच्या क्षेत्रातील राजे आहेत़ प्रत्येकाला आपापल्या आवडीच्या क्षेत्रात राजा होता आले पाहिजे़ हे राजा होणे म्हणजे त्रिसूत्रीचा अंगीकार करणे होय़ करिअरचा कल कोठे आहे, काय येते, किती समजते यावर करिअरची दिशा अवलंबून असते़ त्यामुळे मनाचा, बुद्धीचा कल कोठे आहे हे समजणे गरजेचे आहे़  मेंदू असलेला व इजा न झालेला प्रत्येक जण बुद्धिमान आहे. मात्र प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी असून, ती वेगवेगळ्या क्षेत्रात चालते़ करिअरच्या दृष्टिकोनातून सर्व क्षेत्र ही समान आहेत. स्वत:ची ओळख करून घेत त्यानुसार करिअरची निवड करणे, करिअरला आवश्यक गुण स्वत:मध्ये असणेही तितकेच महत्त्वाचे आहे़  चाणक्य मंडळातील यशस्वी विद्यार्थ्यांची ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली़ धर्माधिकारी यांनी व्याख्यानाच्या सुरुवातीला क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांना श्रद्धांजली वाहिली़कागदावर निवड होण्याचे दिवस संपलेशैक्षणिक व व्यावसायिक नोकरीसाठी सुयोग्य व्यक्तीच्या निवडीसाठी जी परीक्षा घेतली जाते तिला स्पर्धा परीक्षा असे म्हणतात़ केवळ कागदावर निवड होण्याचे दिवस आता संपले असून, यापुढे मुलाखत, व्यक्तिमत्त्व विकास चाचणी, तुमचे वागणे-बोलणे, प्रश्नांची उत्तरे येत नसेल तर नाही म्हणण्याचे धारिष्ट्य यावर निवड अवलंबून असते़ दु:खितांचे अश्रू पुसता आले का यावर करिअरची यशस्वीता अवलंबून असल्याचे धर्माधिकारी यांनी सांगितले़

टॅग्स :Nashikनाशिक