शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोकणगाव फाट्यावर तिहेरी भीषण अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:21 IST

पिंपळगाव बसवंत : मुंबई- आग्रा महामार्गावरील कोकणगाव फाट्यावर असलेल्या शनी मंदिराजवळ गुरुवारी (दि.१८) दुपारी रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकवर कार धडकल्यानंतर बसवर जाऊन आदळल्याने झालेल्या तिहेरी भीषण अपघातात बागलाण येथील तरुणी जागीच ठार झाली असून, अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देतरुणी ठार : चार गंभीर जखमी, कार चक्काचूर

पिंपळगाव बसवंत : मुंबई- आग्रा महामार्गावरील कोकणगाव फाट्यावर असलेल्या शनी मंदिराजवळ गुरुवारी (दि.१८) दुपारी रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकवर कार धडकल्यानंतर बसवर जाऊन आदळल्याने झालेल्या तिहेरी भीषण अपघातात बागलाण येथील तरुणी जागीच ठार झाली असून, अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकहून बागलाणच्या दिशेने जाणाऱ्या टाटा टॅगो कार (क्र. एमएच-०५ डीएच-९३५७) चालकाला कोकणगाव येथील शनी मंदिराजवळ नादुरुस्त असलेल्या ट्रकचा (क्र. एमएच-१५ बीजे-३३५५) अंदाज न आल्याने त्याने ट्रकला कट मारला. त्यातून चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुसऱ्या लेनला गेली असता मागून येणाऱ्या चाळीसगाव डेपोच्या एसटी बसने (क्र. एमएच-२० बीएल-२४१०) कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे कार महामार्गाच्या कडेला असलेल्या खड्ड्यात फेकली गेल्याने कारमधील मुंबई येथे कार्यरत असलेले व बागलाण तालुक्यातील बाभुळना येथील रहिवासी पोलीस हवालदार पंडित बाबूराव चौरे (४७), पत्नी वैशाली पंडित चौरे (३९), मुलगा सागर पंडित चौरे (२२), चालक संजय बागूल (४२) हे गंभीर जखमी झाले, तर मुलगी मयुरी पंडित चौरे (१८) हिचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तीन वाहनांच्या झालेल्या अपघाताची नोंद पिंपळगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक निकुंभ, पवार आदी करत आहेत.टोल प्रशासनाची दिरंगाईमहामार्गावर अपघात घडला अथवा एखादे वाहन रस्त्यातच नादुरुस्त झाले, तर त्याठिकाणी तात्काळ टोल प्रशासन सेवा पुरवत असते. नादुरुस्त वाहनाच्या आजूबाजूला बॅरिकेडस्‌ लावणे, ते वाहन जर महामार्गाच्या मधोमध असेल, तर टोचन करून ते रस्त्याच्या कडेला उभे करणे, अशी टोल प्रशासनाकडून अपेक्षा असते. मात्र, टोलनाक्यापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर ट्रक नादुरुस्त होऊनही टोलनाका प्रशासनाने त्यासंबंधी काहीही कार्यवाही न केल्याने अशा अपघातांना निमंत्रण मिळत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू