शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तचे प्रमाण तिप्पट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 01:12 IST

नाशिक जिल्ह्यात रविवारी १६९ नवीन रुग्ण बाधित आढळून आले असून, त्या तुलनेत अडीच पटीहून अधिक तब्बल ४७३ रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. मंगळवारी (दि. २८) पाच जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ४७२ झाली आहे.

ठळक मुद्देकोरोना : जिल्ह्यात मंगळवारी ४७३ रुग्णांनी केली संसर्गावर मात

नाशिक : जिल्ह्यात रविवारी १६९ नवीन रुग्ण बाधित आढळून आले असून, त्या तुलनेत अडीच पटीहून अधिक तब्बल ४७३ रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. मंगळवारी (दि. २८) पाच जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ४७२ झाली आहे.मंगळवारची दिलासादायक बाब म्हणजे दाखल झालेल्या बाधितांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची ४७३ संख्या ही अडीचपटीहून अधिक आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्याचे प्रयत्न आरोग्य विभागाकडून सुरू आहेत. त्यामुळेच मंगळवारी बरे होऊन घरी सोडलेल्यांची संख्या प्रथमच साडेचारशेपेक्षा अधिक अर्थात ४७३ झाली. बळी गेलेल्या पाच रुग्णांमध्ये नाशिक शहरातील तीन, एक इगतपुरीचा, तर दिंडोरीच्या नागरिकाचा एक असे हे प्रमाण आहे.केवळ २,४१४ बाधितांवर उपचारजिल्ह्यात दाखल संशयितांची संख्या १०१३वर तर प्रलंबित अहवालांची संख्या ११११ वर पोहोचली आहे. मंगळवारी बाधित नवीन १०१३ रुग्णांमुळे एकूण बाधितसंख्या १२,६५७ झाली आहे. त्यातील ९७७१ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन त्यांच्या घरी परतले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या २,४१४ झाली आहे.पेठ तालुका कोरोनामुक्तजून महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, देवळा आणि कळवण ही चार तालुके कोरोनामुक्त होते. मात्र, जुलै महिना सुरू होईपर्यंत प्रारंभी देवळा आणि कळवण तर त्यानंतर सुरगाणा आणि पेठ तालुक्यातही कोरोनाचे काही बाधित आढळून आले. मात्र, जुलैच्या अखेरपर्यंत त्यातील पेठ तालुक्यातील बाधित पूर्णपणे बरे होऊन घरी परतले असल्याने पेठ तालुका पुन्हा एकदा कोरोनामुक्त झाला आहे.

टॅग्स :NashikनाशिकCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या