त्र्यंबकेश्वर : सध्या त्र्यंबकेश्वर शहरात थंडीचा कडाका सुरू असून दिवसादेखील उबदार कपडे वापरावे लागत आहेत. थंडीमुळे रात्री ८ वाजताच व्यवहार बंद करु न व्यावसायिकांना घरी जावे लागते. अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून उब निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या शहरात थंडीने कहर केला असून शहरातील पाणी देखील अतिशय थंडगार वाटते. ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसतात.थंडीमुळे मजुर मंडळी उशीरा येतात व संध्याकाळची सुटीही लवकर होत असते. कारण यातील काही कारागिर परगावचे असल्याने ते सुटीही लवकर करून घेतात. ही थंडी गहू व हरबरा या पिकांना मात्र लाभदायक असल्याचे तालुका कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी सांगितले. द्राक्षाला ही थंडी हानीकारक असून त्यापासून द्राक्षबागांचे संरक्षण केले जात असल्याचे बेझे येथील द्राक्ष बागायतदार राजाराम चव्हाण यांनी सांगितले.
त्र्यंबकेश्वरला थंडीचा कडाका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 01:10 IST
त्र्यंबकेश्वर : सध्या त्र्यंबकेश्वर शहरात थंडीचा कडाका सुरू असून दिवसादेखील उबदार कपडे वापरावे लागत आहेत. थंडीमुळे रात्री ८ वाजताच व्यवहार बंद करु न व्यावसायिकांना घरी जावे लागते. अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून उब निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या शहरात थंडीने कहर केला असून शहरातील पाणी देखील अतिशय थंडगार वाटते. ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसतात.
त्र्यंबकेश्वरला थंडीचा कडाका !
ठळक मुद्दे द्राक्षाला ही थंडी हानीकारक