शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

टॅँकरचा प्रस्ताव देऊनही त्र्यंबकेश्वर तालुका अद्याप तहानलेलाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 14:36 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई सुरु आहे. ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. वारंवार मागणी करु नही तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करूनही अद्याप टँकरने पाणी मिळत नाही. त्यामुळे तहानलेल्या सोमनाथनगर, होलदार नगर, शिवाजीनगर, मूलवड, मुरंबी, विनायकनगर, देवळा, मेटघर किल्ला व सहा पाडे आदींसह या गावांना प्राधान्याने पिण्याच्या ...

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई सुरु आहे. ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. वारंवार मागणी करु नही तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करूनही अद्याप टँकरने पाणी मिळत नाही. त्यामुळे तहानलेल्या सोमनाथनगर, होलदार नगर, शिवाजीनगर, मूलवड, मुरंबी, विनायकनगर, देवळा, मेटघर किल्ला व सहा पाडे आदींसह या गावांना प्राधान्याने पिण्याच्या पाण्याचे टँकर किंवा अन्य उपाययोजना उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रु पांजली माळेकर यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या पत्रात कळविले आहे. दोन महिन्यांपुर्वीच सोमनाथनगर येथील ग्रामसेवकांनी पाणी टंचाईचा प्रस्ताव सादर केला असतांना तो लालफितीत अडकल्याने गावकºयांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले आहे. वेळोवेळी पाठपुरावा करु नही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टंचाई शाखेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावांचे पाणी टंचाई प्रस्ताव दाखल झालेले आहेत. मात्र अद्याप पाणी टंचाई टँकर सुरु न झाल्याने जनता मेटाकुटीला आली आहे. माळेकर यांनी हरसूल गटात पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या पत्राचा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाणीटंचाईचा उल्लेख केला आहे. दिवसागणिक परिस्थिती भीषण होत आहे. या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडून ही मार्चनंतर पाणी टंचाईस तोंड द्यावे लागते. त्यामुळे विविध गावांतुन टँकरची मागणी आल्यानंतर तातडीने टँकरला मंजूरी देण्याची आवश्यकता असते. मात्र,तालुका प्रशासनाकडून पाणी टंचाई प्रस्ताव छोट्या छोट्या कारणांनी फेटाळण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अनेक दिवस हे प्रस्ताव प्रलंबित राहतात. नागरिकांना वणवण भटकण्याची वेळ आली आहे.----------------जलयुक्त शिवार योजनेबाबत विचारणागावांचा टंचाई कृती आराखड्यात समावेश आहे. जलयुक्त शिवार योजनेत समावेश आहे का ? अशी विचारणा करून प्रस्ताव प्रलंबित ठेवले जात आहेत. कालापव्यय केला जात आहे, यात ग्रामसेवक शासनाचा प्रतिनिधी असल्याने त्यांनी दिलेला पाणी टंचाई प्रस्ताव ग्राह्य धरला जावा जेणे करु न गाव पातळीवरु न जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव येण्यास विलंब होणार नाही. मात्र आलेल्या प्रस्तावाची खातरजमा करण्यासाठी तहसिलदार गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता आदींची समिती प्रस्ताव खरा की खोटा याची खातरजमा करण्यासाठी व्हेरीफिकेशन नाट्य घालुन नाहक कालापव्यय केला जातो. यास्तव गावकºयांना लवकर पाणी मिळावे व टँकर लवकरात लवकर सुुरु करावेत अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक