त्र्यंबकेश्वर : तालुक्यात सध्या भात खोचणी व भात आवणीची कामे सुरू झाली असून, ज्यांची भाताची रोपे खणणी जोगी झाली आहे अशा शेतकऱ्यांच्या कामाला वेग आला आहे. तरीही तालुका कृषी कार्यालयाने भात, नागली, वरई, उडीद, खुरसणी व अन्य खरीप पिकांसाठी निश्चित केलेल्या व प्रत्येक धान्याच्या लागवडीसाठी जे क्षेत्र निश्चित केले आहे, तेवढ्या क्षेत्रा इतकी पेरणी अद्याप झालेली नाही.त्र्यंबकेश्वर तालुक्यात आतापर्यंत भाताची १०२२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. त्यात त्र्यंबक मंडलमध्ये ३५८, हरसूल मंडल १ मध्ये ४०८ हेक्टर, हरसूल २ मध्ये २५५ हेक्टर, नागली सर्वसाधारण क्षेत्र ४०२९ हेक्टर आहे. त्यापैकी त्र्यंबकेश्वर मंडलमध्ये १४४हेक्टर, हरसूल १ मध्ये १६४ हेक्टर, हरसूल २ हेक्टर, १०३ हेक्टर अशी एकूण ४१० हेक्टर क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे.वरईचे सर्वसाधारण क्षेत्र ३५२७ हेक्टर आहे. त्यापैकी त्र्यंबकेश्वर १२६ हेक्टर, हरसूल १ मध्ये १४४ हेक्टर, अशी एकूण ३६० हेक्टर क्षेत्रात हरसूल १ ची पेरणी पूर्ण झाली आहे. हरसूल २ मंडलमध्ये ९० हेक्टर मिळून हरसूल दोनमध्ये एकूण ३६० हेक्टर क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे.उडीद सर्वसाधारण क्षेत्र १६४८ हेक्टर त्यापैकी त्र्यंबकेश्वर मंडलमध्ये ३२ हेक्टरमध्ये पूर्ण, हरसूल १ मंडलमध्ये ३६ हेक्टर, तर हरसूल २ मध्ये २३ हेक्टर अशी ९० टक्के पेरणी उडिदाची झाली आहे.थोडक्यात तालुक्यात भात १०२२ हेक्टर, नागली ४१० हेक्टर, वरई ३६० हेक्टर, तर उडीद ९० हेक्टर अशी एकूण पेरणी झाली आहे.कृषी विभागातर्फे रोपवाटिकात्र्यंबकेश्वर तालुक्यात मुख्यत्वे वरील चारच पिके सातत्याने घेतली जातात. आदिवासी भागात उडीद दाळ लाकप्रिय कडधान्य आहे. तसेच नागलीची भाकरी व वरई प्रामुख्याने भगर करण्यासाठी काही प्रमाणात भाकरीही केली जाते. भगरीचा भात उपवासासाठीदेखील वापरतात. नागलीला तर खूपच मागणी असते. हॉटेलमध्ये तर नागलीच्या पापडाला भाकरीला खूपच मागणी असते. या भागातील इंद्रायणी तांदूळ, १००८ तांदूळ (जिरा राइस) कमोद आदी उच्च प्रकारचा तांदूळ पिकविला जातो. इगतपुरीच्या खालोखाल भात पिकविण्यात त्र्यंबकेश्वर तालुक्याचा नंबर लागतो. ही जी पेरणी झाली ती रोपवाटिकाद्वारे (जमीन भाजून पेरणी करून रोपे तयार केली जातात. त्यास कृषी विभागाने रोपवाटिका असे नाव दिले आहे.
त्र्यंबकेश्वरला भात आवणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:12 IST
त्र्यंबकेश्वर तालुक्यात सध्या भात खोचणी व भात आवणीची कामे सुरू झाली असून, ज्यांची भाताची रोपे खणणी जोगी झाली आहे अशा शेतकऱ्यांच्या कामाला वेग आला आहे.
त्र्यंबकेश्वरला भात आवणी सुरू
ठळक मुद्देखोचणी सुरू : तालुका परिसरात मुसळधार पावसामुळे शेतीकामांना प्रारंभ