शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 18:09 IST

मागण्यांवर ठाम : महाशिवरात्रीच्या तोंडावर उपसले हत्यार

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांनी महाशिवरात्रीच्या तोंडावर संपाचे हत्यार उपसल्याने देवस्थान ट्रस्टने पर्यायी उपाययोजना तयार ठेवली आहे.

त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्ह्यातील महत्वाचे तीर्थक्षेत्र आणि ज्योर्तिलिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या १३६ कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी महाशिवरात्रीच्या तोंडावर संपाचे हत्यार उपसल्याने देवस्थान ट्रस्टने पर्यायी उपाययोजना तयार ठेवली आहे.त्र्यंबकेश्वर देवस्थान कर्मचारी संघटना सी.आय.टी.यु.शी संलग्न असून संघटनेचे सरचिटणीस सिताराम ठोंबरे यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला संपाबाबत नोटीस दिली आहे. कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी शनिवार (दि.२) पासून संप पुकारला आहे. त्यात प्रामुख्याने, सर्व कर्मचा-यांना समान वेतन मिळावे, साप्ताहिक सुटी मिळावी, महिला कर्मचा-यांना कायद्यानुसार प्रसुती रजा मिळावी व स्वच्छतागृहाची सोय करण्यात यावी, कर्मचाºयांना सुटी मंजुर व नामंजुर करण्याचे अधिकार असलेले विश्वस्त कार्यालयात उपलब्ध असावेत, कायद्यानुसार ८ तासांपेक्षा जास्त असलेल्या जादा कामाचा मोबदला दुप्पट दराने मिळावा, जेवणाच्या जागेची सोय व वेळ उपलब्ध करु न द्यावी, महागाईनुसार पाच हजार रु पयांची वेतनवाढ मिळावी आदी मागण्यांचा समावेश आहे.बचत गटाच्या माध्यमातून कामविश्वस्त मंडळाने संपाच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटाच्या २५ महिला, पुरोहित संघाचे पदाधिकारी व सदस्य तसेच तुंगार ट्रस्टचे कर्मचारी आदींच्या मदतीने काम चालू केले आहे. सोमवारी (दि.४) महाशिवरात्र उत्सव असल्याने त्र्यंबकेश्वर मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी उसळणार आहे. त्यामुळे ६० पोलिस कर्मचारी व ७० गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तासाठी बोलविण्यात आले असल्याची माहिती विश्वस्त तृप्ती धारणे यांनी दिली आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकStrikeसंप