त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगरपरिषदेने या पुढे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कामगार, शिपाई, वसुली कारकून आदी कर्मचाऱ्यांना शासनाने ठरवून दिलेल्या किमान वेतन कायद्यानुसारच जो ठेकेदार वेतन देईल, त्यालाच ठेका द्यावा, अशी मागणी नगरसेवक स्वप्निल शेलार यांनी एका निवेदनाद्वारे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्याकडे केली आहे.त्र्यंबक नगरपरिषदेच्या विविध विभागात कंत्राटी तत्त्वावर काम करणारे कामगार वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे काम करत आहेत. विद्यमान ठेकेदाराची मुदत येत्या काही दिवसांत संपणार असल्याने नवीन निविदा काढली आहे, पण कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना करारात ठरल्याप्रमाणे किमान वेतन मिळत नाही. पर्यायाने अपुऱ्या वेतनात त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणे शक्य होत नाही, तरी यापुढे कंत्राटी कामगारांना शासनाच्या नियमानुसार किमान वेतनानुसार वेतन मिळणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे, नवीन टेंडरमध्ये जो ठेकेदार कर्मचाऱ्यांना किमान वेतन देईल, अशाच ठेकेदाराला कंत्राटी पद्धतीने कामगार पुरविण्याचा ठेका देण्यात यावा, असे निवेदनात शेलार यांनी म्हटले आहे.यावेळी बांधकाम सभापती कैलास चोथे, कुणाल उगले आदी उपस्थित होते.
किमान वेतन देणाऱ्यांनाच ठेका देण्याची मागणी त्र्यंबकेश्वर : नगराध्यक्षांकडे नगरसेवकाचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 00:01 IST
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगरपरिषदेने या पुढे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कामगार, शिपाई, वसुली कारकून आदी कर्मचाऱ्यांना शासनाने ठरवून दिलेल्या किमान वेतन कायद्यानुसारच जो ठेकेदार वेतन देईल, त्यालाच ठेका द्यावा, अशी मागणी नगरसेवक स्वप्निल शेलार यांनी एका निवेदनाद्वारे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्याकडे केली आहे.
किमान वेतन देणाऱ्यांनाच ठेका देण्याची मागणी त्र्यंबकेश्वर : नगराध्यक्षांकडे नगरसेवकाचे निवेदन
ठळक मुद्देठेकेदाराची मुदत येत्या काही दिवसांत संपणार