त्र्यंबकेश्वर : ‘बम बम भोले’चा जयघोष करीत महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांनी भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पारंपरिक पद्धतीने भगवान त्र्यंबकराजाची पालखी मिरवणूक काढण्यात आली.महाशिवरात्रीला मंदिर बंद होईपर्यंत गर्भगृह बंद ठेवण्याचा निर्णय त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे तिन्ही त्रिकाल पूजेसाठी पुजारीवगळता भाविकांना गर्भगृह बंद ठेवण्यात आले होते. सकाळी पारंपरिक मार्गाने त्र्यंबकराजाची पालखी कुशावर्तावर नेण्यात आली. ठिकठिकाणी पालखीचे औक्षण करण्यात आले. कुशावर्तावर नेहमीप्रमाणे देवाचे स्नान पूजा-आरती होऊन पालखी मंदिरात आणण्यात आली. तीर्र्थराज कुशावर्तावरही भाविकांची स्नानासाठी गर्दी उसळली होती. पालिकेचे व खासगी वाहनतळं पूर्णपणे भरली होती. पूर्वेकडील दर्शनरांगेतील आतील प्रांगणातील जवळपास साठ रांगा भरून मंदिराच्या बाहेर रिंगरोडने थेट उदासीन बडा आखाड्यापर्यंत दर्शन रांग पोहोचली होती. याशिवाय देणगी दर्शनाची रांगदेखील बºयाच दूरवर गेली होती.यासाठी भाविकांनी केलेल्या या सहकार्याबद्दल देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांचे आभार मानण्यात आहे. याबरोबरच महाशिवरात्री-निमित्ताने तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पारंपरिक पद्धतीने पालखी मिरवणूकमहाशिवरात्रीनिमित्त पारंपरिक पद्धतीने व पारंपरिक मार्गाने महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाची पालखी कुशावर्तावर नेण्यात आली. त्र्यंबकेश्वर मंदिरातून निघालेली पालखी मिरवणूक लक्ष्मीनारायण चौकातून पाच आळीमार्गे त्र्यंबकेश्वर देवस्थानचे सर्वात जुने सोलट्रस्टी श्री. जोगळेकर यांच्या वाड्यासमोरून कुशावर्तावर नेण्यात आली. पालखी मार्गावर ठिकठिकाणी पालखीचे औक्षण करण्यात आले. कुशावर्तात नेहमीप्रमाणे देवाचे स्नान, पूजा, आरती होऊन पालखी नेहमीप्रमाणे पारंपरिक मार्गाने मंदिरात आणली. पालखीसमवेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पालखी सोहळ्यात भाविकांनी सहभागी होत पालखीची शोभा वाढविली. यावर्षी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने मंदिरावर विद्युत रोषणाईऐवजी स्ट्रक्चरल लाइटचे लेसर सोडले आहेत.
त्र्यंबकला भाविकांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:19 IST
‘बम बम भोले’चा जयघोष करीत महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांनी भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पारंपरिक पद्धतीने भगवान त्र्यंबकराजाची पालखी मिरवणूक काढण्यात आली.
त्र्यंबकला भाविकांची मांदियाळी
ठळक मुद्देबम बम भोलेचा जयघोष : महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवदर्शन !