शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबक राजाचे वॉललाईव्ह एलईडी दर्शन सुविधा उपलब्ध करु न द्यावी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 19:06 IST

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर रथाच्या निवारा गृहाजवळ सध्या असलेल्या एल ई डी वॉल लाईव्ह दर्शन सेवा भाविकांसाठी खुली करावी अशी मागणी येथील ग्राहक मंचच्या वतीने उपविभागीय तथा प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसिलदार दीपक गिरासे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देग्राहक मंचची मागणी : कर आकारणीत सुट मिळावी यासाठी निवेदन सादर

लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर रथाच्या निवारा गृहाजवळ सध्या असलेल्या एल ई डी वॉल लाईव्ह दर्शन सेवा भाविकांसाठी खुली करावी अशी मागणी येथील ग्राहक मंचच्या वतीने उपविभागीय तथा प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसिलदार दीपक गिरासे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या मागणी बरोबरच त्र्यंबक नगरपरिषदेने चार महिन्याचे गाळा भाडे घरपट्टी पाणीपट्टी किंवा एकत्रित कर आकारणीत सुट मिळावी आशा आशयाचे दुसरे निवेदन त्र्यंबक नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर मुख्याधिकारी संजय जाधव यांना दिले आहे.तहसिलदार कार्यालयात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भगवान त्र्यंबक राजाचे मंदीर उघडे असेल तर व्यावसायिकांना आर्थिक लाभ होत असतो. मात्र मंदिर केव्हा उघडायचे हा प्रश्न शासनाचा असला तरी मंदिराबाहेर वॉल लॉईव्ह एलईडी दर्शन सेवा सुरु करावी, कारण गेल्या चार महिन्यां पासून त्र्यंबकेश्वर मंदीरासह गावातील सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. बाजारपेठच बंद पडली आहे. सर्वांचेच व्यवसाय बंद पडल्याने उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने. अशा परिस्थितीत टेलिफोन बील, विजबील, घरभाडे, दुकानभाडे, घरपट्टी, पाणी पट्टी आदी भरणे नागरीकांना अवघड झाले आहे. म्हणुन पालिकेने मानवतेच्या दृष्टीकोनातुन सर्वच करात सवलत द्यावी. व उपविभागीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांच्याशी बोलुन वॉल लाइव्ह एलईडी दर्शन सुविधा उपलब्ध करु न द्यावी. अशी मागणी निवेदनात केली आहे.या निवेदनावर ग्राहक मंचचे अध्यक्ष अमर सोनवणे, नरेंद्र पेंडोळे, सुनीता भुतडा, स्विप्नल पाटील, राजेंद्र पाठक, केशव ढोन्नर, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पंकज भुतडा, पंकज धारणे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :GovernmentसरकारTempleमंदिर