शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

नद्यांच्या उगमस्थानातील आदिवासी गावेच पाण्यासाठी व्याकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:14 IST

नितीन बोरसे, सटाणा : सह्याद्रीच्या पर्वतरांगा ...गड-किल्ले आणि त्यावरील निसर्गसंपदा या निसर्गसौंदर्याने नटलेल्या बागलाणच्या पश्चिमेकडील डोंगर-दर्‍यांमधील आदिवासी परिसर मोसम ...

नितीन बोरसे, सटाणा : सह्याद्रीच्या पर्वतरांगा ...गड-किल्ले आणि त्यावरील निसर्गसंपदा या निसर्गसौंदर्याने नटलेल्या बागलाणच्या पश्चिमेकडील डोंगर-दर्‍यांमधील आदिवासी परिसर मोसम आणि आरम या दोन प्रमुख नद्यांसोबतच कळवणमधील पुनंद नदी यांचे उगमस्थान आहे. मात्र तीन तालुक्यांची तहान भागविणारा उगम परिसर उन्हाळ्यात पाण्यासाठी नेहमीच व्याकूळलेला असतो. त्यामुळे या आदिवासी गावांची तहान भागविण्यासाठी ठोस पाणीपुरवठा योजनांची गरज आहे .

बागलाण तालुक्यात सलग दोन वर्षांपासून पाऊस चांगल्या प्रमाणात बरसल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीला आज तरी मुबलक प्रमाणात पाणी आहे. तालुक्यातील मोसम, आरम आणि कळवणकडे जाणारी पुनंद अशा तीन मोठ्या नद्यांचे उगमस्थान एतिहासिक किल्ला साल्हेर आहे. याच नद्यांवर अनुक्रमे हरणबारी, केळझर आणि पुनंद या तीन मध्यम प्रकल्पांची उभारणी केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे तिन्ही प्रकल्प ऑगस्ट महिन्यातच ओव्हर फ्लो झाल्यामुळे लाभक्षेत्रात यंदा मुबलक प्रमाणात पाणी आहे. आजच्या घडीला ११६६ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या हरणबारी धरणात ६५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. ५७२ दशलक्ष घनफूट पाण्याची क्षमता असलेल्या केळझर धरणात २१६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे साहजिकच पाणीटंचाईची ओरड नसल्यासारखी दिसून येते. असे असले तरी बागलाणसह मालेगाव, कळवणची तहान भागविणार्‍या साल्हेर परिसरातील २२ वाड्या-पाड्यांची परिस्थिती या उलट आहे. या भागातील साल्हेरसह आठ पाडे साळवण, घुळमाळ, मानूरचे बारा पाडे येथे आजही फेब्रुवारी महिन्यात पाणीटंचाई डोके वर काढते. या भागातील सुमारे ७५ रहिवासी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात . एकीकडे पाणीटंचाई, दुसरीकडे मजुरीला केल्याशिवाय पोटाची खळगी कशी भरणार, या विवंचनेत या भागातील आदिवासी आहेत. त्यामुळे मजुरी आणि पाणीटंचाई या दुहेरी संकटावर मात करण्यासाठी येथील आदिवासी कुटुंबे देशी भागात स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे या भागातील पाणी संकट दूर करण्यासाठी केळझर अथवा हरणबारी धरणातून ठोस पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे काळाची गरज आहे.

-------------

सटाणेकरांना मिळणार पाणी

सटाणा शहरासाठी पुनंद प्रकल्पातून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मजूर करण्यात आली आहे. त्याचे काम पूर्णत्वास आले आहे. शहरांतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे कामदेखील अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात योजनेची चाचणी घेऊन १ मे महाराष्ट्रदिनी शहराला पूर्ण क्षमतेने पाणी मिळणार आहे. आज जरी ही योजना कार्यान्वित नसली तरी ठेंगोडा पाणीपुरवठा योजना शहराची तहान भागवत असल्यामुळे पाणीटंचाई आज तरी भासत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

--------------------

टंचाई ग्रस्त गावे

तालुक्यातील कातरवेल, रातीर, राहुड, वघानेपाडा, दोधनपाडा, चिराई या गावांना पाणीटंचाई ही पाचवीला पूजलेली आहे. तालुक्यात पाणीटंचाईचे डोके येथूनच वर निघत असते. फेब्रुवारी, मार्च महिन्यात टँकर मागणीला सुरुवात होते. आजच्या घडीला या गावांनी टँकर मागणीचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे सादर केले असून, दोन दिवसांत त्याला मंजुरी मिळून टँकर सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

-----------------

टँकरग्रस्त गावे -६,

एकूण हातपंप ६२२ , सुरू ६२०, बंद २

-----------------------

बागलाण तालुक्यातील प्रमुख नद्यांचे उगमस्थान असलेल्या साल्हेर परिसरात तीव्र पाणीटंचाई असून, महिलांना पाण्यासाठी अशी कसरत करावी लागत आहे. (१९ सटाणा १/२)

===Photopath===

190421\19nsk_11_19042021_13.jpg

===Caption===

१९ सटाणा १/२