येवला तालुक्यातील आदिवासी पैठणी कारागीरांना मिळणार शबरी घरकुल लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 09:01 PM2020-07-10T21:01:52+5:302020-07-11T00:13:51+5:30

येवला : तालुक्यातील आदिवासी पैठणी विणकर, कारागीरांची माहिती ग्रामपंचायतीमार्फत संकलित करून प्रस्ताव आदिवासी विभागाकडे पाठविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्याने शासनाच्या शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Tribal Paithani artisans of Yeola taluka will get Shabari Gharkul benefit | येवला तालुक्यातील आदिवासी पैठणी कारागीरांना मिळणार शबरी घरकुल लाभ

येवला तालुक्यातील आदिवासी पैठणी कारागीरांना मिळणार शबरी घरकुल लाभ

googlenewsNext

येवला : तालुक्यातील आदिवासी पैठणी विणकर, कारागीरांची माहिती ग्रामपंचायतीमार्फत संकलित करून प्रस्ताव आदिवासी विभागाकडे पाठविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्याने शासनाच्या शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येवला शहरासह तालुक्यात पैठणी उत्पादन व कारागीरी व्यवसायात गेल्या काही वर्षात मागासवर्गीय, आदिवासींसह सर्वच समाज घटक आले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांनी आदिवासी पैठणी कारागीर, विणकरांची माहिती ग्रामपंचायतमार्फत येवला पंचायत समितीकडे संकलित करून त्यांचे प्रस्ताव तयार करून आदिवासी विकास विभागाकडे पाठवण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. यामुळे आदिवासी पैठणी विणकर, कारागीरांचा घरकुलाचा प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
----------------
शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन आदिवासी तरूण-तरूणी पैठणी विणकाम शिकले. मात्र, स्वत: उत्पादक होण्यासाठी व हातमाग टाकण्यासाठी डोक्यावर पक्के छप्पर गरजेचे असल्याने आदिवासी विणकर, कारागीरांच्या घरकुलांचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
येवला पंचायत समिती सभापती प्रविण गायकवाड यांनी आदिवासी पैठणी, विणकर कारागीरांचा घरकुलाचा हा प्रश्न जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडे मांडला होता.

Web Title: Tribal Paithani artisans of Yeola taluka will get Shabari Gharkul benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक