शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी मजुरांची घरवापसी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:35 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने संपूर्ण भारत १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन केल्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे रस्ते बंद झाल्याने आणि हाताला कामही न उरल्याने पेठ तालुक्यातील रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या शेकडो शेतमजुरांचा घरवापसीचा प्रश्न अवघड बनला आहे.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : रस्ते बंद, शिधा संपला, हाताला काम नाही

पेठ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने संपूर्ण भारत १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन केल्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे रस्ते बंद झाल्याने आणि हाताला कामही न उरल्याने पेठ तालुक्यातील रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या शेकडो शेतमजुरांचा घरवापसीचा प्रश्न अवघड बनला आहे.मार्च महिना हा तसा द्राक्ष काढणीचा कालावधी असतो. याच काळात पेठ व सुरगाणा तालुक्यातील शेकडो शेतमजूर जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर रोजगारासाठी स्थलांतरित होत असतात. कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे सर्वत्र संचारबंदी लागू झाल्याने आता या मजुरांनाही गावाकडची ओढ लागली आहे. हाताला काम नाही, सोबत आणलेला शिधाही संपला, शासन घराबाहेर पडू देत नाही, सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने गावाकडे जावे तरी कसे या विवंचनेत मजूर सापडले आहेत. गत दोन दिवसापासून आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस व प्रशासनाच्या मदतीने आदिवासी भागातील सामाजिक संस्था व कार्यकर्ते या शेतमजूरांना आधार देत असून शासकिय प्रक्रि या पुर्ण करून टप्याटप्याने मजूरांना गावाकडे पाठवले जात आहे. गिरणारे, गंगापूर, पाथर्डी परिसरात हरसूल व त्या भागातील शेतमजूरांनी वाहनाअभावी ३५ ते ४० कि.मी. अंतर पायपीट करत आपले घर गाठलेआहे.दरम्यान, पेठ तालुक्यातील मजुरीसाठी गेलेले काही लोक इतर भागात अडकलेले असू शकतात. तरी याबाबतीत काही माहिती मिळाल्यास ती तहसील कार्यालयास द्यावी, माहिती देताना त्यांचे मूळ गाव, किती लोक आहेत व नेमके कुठे आहेत त्याची माहिती द्यावी, असे आवाहन पेठ तालुक्याचे तहसीलदार, संदीप भोसले यांनी केले आहे.आदिवासी भागातील घरातील काम करण्यायोग्य जोडपी रोजगारासाठी स्थलांतरीत होत असतात. त्यांची शाळेतील व लहान मुले मात्र आजी आजोबा किंवा शेजाऱ्यांच्या भरवशावर गावीच राहतात. सध्या सर्वत्र कोरोना बाबत काळजी घेतली जात असतांना स्थलांतरीत झालेल्या आई वडिलांना गावी असलेल्या मुले व नातेवाईकांची काळजी वाटू लागली आहे. त्यामुळे कसेही करून गाव गाठण्यासाठी मजूर ताटकळत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य