शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘वन’वासीच्या संघ संकल्पनेला आदिवासींकडूनच छेद

By संजय पाठक | Updated: October 15, 2018 01:38 IST

देशातील मूळ रहिवासी असलेल्यांना ‘वनवासी’ संबोधून सेवा कार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत वनवासी कल्याण आश्रमाच्या संकल्पनेला आता काही आदिवासींकडूनच हादरे देण्यास प्रारंभ झाला आहे. त्याअंतर्गत वनवासी कल्याण आश्रमाची मोटार रोखून त्यावरील वनवासी नाव खोडण्याचा प्रकार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात घडला आहे तर दुसरीकडे थेट स्वयंसेवकांशी संपर्क साधून आदिवासींची संस्कृती बदलण्याचा प्रमाद करू नका, अशाप्रकारचे इशारेदेखील दिले जाऊ लागले आहेत.

ठळक मुद्देविरोध : नाशिकमध्ये मोटार रोखून बदलले नाव, स्वयंसेवकांकडे नोंदविला जातोय आक्षेप

नाशिक : देशातील मूळ रहिवासी असलेल्यांना ‘वनवासी’ संबोधून सेवा कार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत वनवासी कल्याण आश्रमाच्या संकल्पनेला आता काही आदिवासींकडूनच हादरे देण्यास प्रारंभ झाला आहे. त्याअंतर्गत वनवासी कल्याण आश्रमाची मोटार रोखून त्यावरील वनवासी नाव खोडण्याचा प्रकार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात घडला आहे तर दुसरीकडे थेट स्वयंसेवकांशी संपर्क साधून आदिवासींची संस्कृती बदलण्याचा प्रमाद करू नका, अशाप्रकारचे इशारेदेखील दिले जाऊ लागले आहेत.देशातील मूळ निवासी असलेल्या आदिवासींच्या क्षेत्रात १९५२ पासून संघाची वनवासी कल्याण आश्रम शाखा काम करते. महाराष्टÑात १९७८ पासून या पद्धतीचे काम करण्यात येते. सेवा, शिक्षण आणि अन्य प्रकल्पांमधून आदिवासींना आधार देतानाच त्यांना उभारी दिल्याचा दावा आश्रमांकडून केला जातो. त्यासाठी अखिल भारतीय स्तरावर वनवासी कल्याण समितीशी संलग्न संस्था कार्यरत आहेत. मात्र, त्यातील नेमक्या वनवासी कल्याण आश्रम या नावातील वनवासी या शब्दाला आक्षेप घेण्यात येत आहे़ वनवासी, गिरीवासी, वनबंधू हे शब्द आदिवासींचे वेगळेपण दाखवितात, परंतु ते मूळ निवासी नसल्याचा आक्षेप असल्याचे सांगून त्याला अनेक ठिकाणी आदिवासी क्षेत्रात विरोध होऊ लागला आहे. विदर्भासह अनेक भागात वनवासी या शब्दाला विरोध केला जात असतानाच नाशिकमध्ये मात्र त्याला कृतिशील विरोधही होऊ लागला आहे.वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते दिंडोरी तालुक्यात आदिवासी क्षेत्रात मुलांना खाऊ वाटपासाठी जात असताना त्यांचा पिच्छा करणाºया काही आदिवासी युवकांच्या कार्यकर्त्यांनी कोशिंबे येथे मोटार अडवली आणि आश्रमाच्या कार्यकर्त्यांकडे वनवासी शब्दावरून आक्षेप नोंदवला. बिरसा मुंडा किंवा तत्सम आदिवासी क्रांतिकारकांची नावे का वापरत नाही, असा जाब विचारला आणि मोटारीवरील वनवासी हे नाव खोडून टाकले. याप्रकरणी आश्रमाने लखन पवार या कार्यकर्त्यांसह अन्य कार्यकर्त्यांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.वनवासी नाव खोडत असल्याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. दुसरीकडे शासनाच्या टीआरटीआयच्या अशासकीय सदस्य प्रा. अशोक बागुल यांनी वनवासी आश्रमाच्या माध्यमातून काम करणाºया एका वैद्यकीय व्यावसायिकाला दूरध्वनी करून वनवासी शब्द तसेच आदिवासींच्या निसर्गदेवतेपलीकडे अन्य देवांच्या सुरू असलेल्या प्रसाराविषयी आक्षेप नोंदविला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक